AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: सिया-चेतनचे अगोदरच गुपचूप लग्न? केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट … त्या व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक खुलासा

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक खुलाशांची मालिका खंडीत झालेली नाही. अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहे. सिया आणि चेतनच्या व्हॉट्सॲप चॅटमधून त्यांच्या लग्नाची गोष्टी समोर आली आहे. पोलिसांच्या हाती लागलं काय?

Ketan Murder Case: सिया-चेतनचे अगोदरच गुपचूप लग्न? केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट ... त्या व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक खुलासा
केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी, लोहगड
| Updated on: Jul 07, 2026 | 9:24 AM
Share

Siya Goyal-Chetan Chaudhari Marriage: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दोघांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सॲप चॅटआधारे पोलिसांनी हा दावा केला आहे. केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगडावरून ढकलून हत्या करण्यात आली होती. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कुटुंबिय अंधारात? गुपचूप लग्न

मध्यंतरी पोलिसांनी सिया गोयलला तिच्या घरी नेत दुसरा मोबाईल जप्त केला होता. मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या आधारे पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. या दोघांची डिजिटल कुंडलीच पोलिसांनी खंगाळून काढली. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 19 फेब्रुवारी रोजी सिया आणि केतन या दोघांचा धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता. त्याच्या मागेपुढेच हे लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अजून याविषयी सखोल चौकशी करत आहेत. हे लग्न कुटुंबियांपासून लपून केल्याचा दावा करण्यात येत असला तरी काही घडामोडी पाहता कुटुंबातील सदस्यांना त्याची कुणकुण असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा प्लॅन

सिया आणि चेतन यांची मैत्री आणि नंतर प्रेम झाले. दोघेही राजस्थानलाही फिरायला गेले होते. उदयपूर आणि जोधपूर येथे दोघे फिरायला गेले होते. त्यांच्या मित्रांनी दोघांना एकत्र पाहिले होते. दोघांनी मित्रांना लग्न करून राजस्थानमध्येच स्थायिक होण्याची गोष्टही बोलून दाखवली होती. चेतन सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानी संस्कृतीची माहिती देत होता. व्हिडिओ आणि रील्स दाखवत होता. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर अथवा जोधपूर येथे स्थायिक होण्याचा दोघांची इच्छा होती. सद्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अनेक बाबी समोर येतील आणि पोलीस तपासाला बळकटी मिळेल. नोव्हेंबर 2026 मध्ये सिया आणि केतनचे लग्न होणार होते. सियासोबत सुखी आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या केतनला तिच आपली मारेकरी ठरेल हे स्वप्नातही वाटले नाही. 18 जून रोजी चेतन आणि सियाने त्याला लोहगड किल्ल्यानवरून ढकलले.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती