Ketan Agarwal Case : जिवंत आहे केतन… ऐकताच सियाच्या पायाखालची जमीन सरकली, पोलिसांकडे 3 मोठे पुरावे
Ketan Agarwal Case : जेव्हा केतन याला दरीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा, त्याचा चेहरा एका कपड्यात बांधण्यात आलेला. पण ओखळ पटावी म्हणून चेहऱ्यावरचं कापड हटवण्यात आलं... तेव्हा सिया हिचे हावभाव असे होते, ज्यामुळे कुटुंबियांना संशय आला... या संबंधी पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत...

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोघांच्या आई – वडिलांची चौकशी करण्यात आली आहे… केतन याचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, ‘जेव्हा सियाची आई पूजा गोयल यांचा फोन आला तेव्हा आम्ही तात्काळ लोहगडावर पोहोचलो. तेथे उपस्थित असलेल्या एक पोलीस अधिकारी म्हणाल्या, केतनचा श्वास सुरु होता. तेव्हा त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे ऐकताच सिया प्रचंड घाबरली… तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव पूर्णपणे बदलले… ती रडत होती, पण ते सर्व खोटं आहे. आम्हाला कळलं होतं…’, असं केतन याच्या वडिलांनी सांगितलं…
पोलिसांकडे असलेले 3 मोठे पुरावे…
केतन याची हत्या केल्यानंतर सिया आणि चेतन यांनी सर्व पुरावे नष्ट केले. पण पोलिसांच्या तावडीतून दोघे सुटले नाहीत. पोलीस तपासात असे तीन पुरावे सापडले आहेत, जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, केतन एक अनुभवी ट्रेकर होता. त्यामुळे त्याच्या बहिणीला पहिल्यापासूनच संशय होता, की ते असा सहज पडूच शकत नाही…
उन्हाच्या उकाड्यात हुडी घातलेली व्यक्ती…
पोलिसांनी जेव्हा लोहगडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पाहिलं. तेव्हा लोहगड चढताना एक संशयित व्यक्ती देखील पोलिसांना दिसला. ज्याने उकाड्याच्या उन्हात हुडी घातली होती आणि सतत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. एवढंच नाही तर, जेव्हा सिया हिने मागे वळून पाहिलं, तेव्हा ती व्यक्ती खाली बसली… त्यानंतर तपास उघड झालं की, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, सियाचा बॉयफ्रेंड केतन होता…
सिया आणि चेतन यांचे फोन रेकॉर्ड्स
संशय येताच पोलिसांना सिया आणि चेतन यांचे फोन ताब्यात घेतलं. तेव्हा एक धक्कादाय सत्य समोर आलं. जानेवारी पासून 18 जूनच्या सकाळी 7 वाजे पर्यंत सिया हिने एकाच नंबरवर 2004 वेळा फोन केला. दोघांमध्ये तब्बल 338 तास बोलणं झालं. म्हणजे रोज जवळपास 11 कॉल्स आणि 2 तास गप्पा… पोलीस या रेकॉर्ड्सना तपासातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानत आहेत. याव्यतिरिक्त, त्यांच्या फोनवरून डिलीट केलेले व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम चॅट्स पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक टीमडून केला जात आहे.
केतन – सिया यांच्या कुटुंबियांचं काय आहे म्हणणं?
सिया आणि चेतन यांच्यातील कथित संबंधांची आम्हाला काहीच कल्पना नव्हती, असं दोन्ही कुटुंबांनी सांगितलं आहे. केतनच्या वडिलांनी असा दावा केला की, जर सियाने लग्नासाठी आधीच नकार दिला असता, तर हे लग्न जुळवण्याची प्रक्रिया पुढे गेली नसती. दरम्यान, सियाच्या कुटुंबीयांनीही या कथित संबंधांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आहे.
सध्या पोलीस सर्व डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अधिक तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तपासाला निश्चितच एक नवीन पैलू प्राप्त झाला असला, तरी त्याचे कायदेशीर महत्त्व आणि परिणाम तपास पूर्ण झाल्यानंतर व न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतरच स्पष्ट होतील. आता या प्रकरणात पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
