AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime: बिनधास्त आले… पाचे ते सहा राऊंड झाडल्या गोळ्या… बिश्नोई गँगचा रात्रीचा थरार.. पुण्यात  घडलं काय?

Pune Bishnoi Gang Firing: पिंपरी चिंचवड काल हादरले. लॉरेन्स बिश्नोई गँगने एजे मॉलच्या दिशेने काल बेछुट गोळीबार केला. रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत माजली. हा त्या व्यापाऱ्याला या गँगने दिलेला फायनल अल्टिमेटम मानल्या जात आहे.

Pune Crime: बिनधास्त आले... पाचे ते सहा राऊंड झाडल्या गोळ्या... बिश्नोई गँगचा रात्रीचा थरार.. पुण्यात  घडलं काय?
पिंपरी चिंचवड, बिश्नोई गँगImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 9:38 AM
Share

Pimpri Chinchwad Gang Firing: पुणे हे विद्येचे माहेरघर आहे की गुन्हेगारांची, असा संताप व्यक्त होत आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत असताच आता लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशतही समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शुटर्सनी भररस्त्यात उभे राहत एजी फर्निचर मॉलच्या दिशेने धडाधड गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मुंबईनंतर बिश्नोई गँगची पुण्यात दहशत दिसून आली. सुदैवाने या घटनेवेळी घटनास्थळी कोणी नव्हते. या शूटर्सने मॉलच्या नाम फलकावर गोळीबार केला. आरोपी हे बाईकवरून आले होते. रात्री 9:20 मिनिटांनी हा गोळीबार करण्यात आला. या आरोपींनी पाच ते सहा राऊंड फायर केले. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी- चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला. दोघांनी दोन पिस्तुलातून सहा गोळ्या झाडल्या. या गँगने व्यापाऱ्याला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये लॉरेन बिश्नोई गॅंग चा सदस्य शुभम लोणकर च्या शूटरने थेट फर्निचर मॉलवर गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या फर्निचर मॉलवर झाडल्या. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मॉलच्या दिशेने 5-6 गोळ्या झाडल्या. त्यात मॉल ची काच फुटली आहेय

‘एजे’ फर्निचर मॉल चे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्स तस्कर असल्याचा उल्लेख करत हा केवळ ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल अशी धमकी देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बिष्णोई गॅंगच्या शूटरच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आलेत. पोलीस लॉरेन बिष्णोइ गॅंग संदर्भात तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली.

गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली

पिंपरी चिंचवडमधील एजे फर्निचर मॉलवर केलेल्या गोळाबाराची जबाबदारी आरजू बिष्णोईने घेतली आहे. याविषयाची ऑडिओ समोर आला आहे. टीव्ही ९ याची पुष्टी करत नाही.पिंपरी चिंचवडमध्ये AJ फर्निचर वर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. या अनुषंगाने लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आरजू बिष्णोईचा नावाने एक ऑडिओ समोर आला आहे. जो आमच्या विरोधात आहे, त्याची आणि आमची लवकरचं भेट होईल. असा इशारा ही या ऑडिओद्वारे देण्यात आलाय. हा ऑडिओ खरंच लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.

Follow Us
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार