AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाविकास आघाडी टिकेल अशी कुठली चिन्ह दिसत नाहीत”; शिवसेनेच्या नेत्याने मविआ फुटणार त्याची कारणं सांगितली…

नोटबंदीचा निर्णय हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसतो हा निर्णय कुठल्याही पक्षाच्या बैठकीत झालेला नाही तर हा निर्णय सर्वस्वी रिझर्व्ह बँकेचा असतो रिझर्व्ह बँकेमध्ये अर्थव्यवस्थेतील अतिशय तज्ज्ञ लोक असतात.

महाविकास आघाडी टिकेल अशी कुठली चिन्ह दिसत नाहीत; शिवसेनेच्या नेत्याने मविआ फुटणार त्याची कारणं सांगितली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 21, 2023 | 7:26 PM
Share

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना आणि भाजप असा सामना रंगला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झाले असले तरी सत्ताधाऱ्यांकडूनही आता महाविकास आघाडीतील हेवेदावे उखरुन काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीवर आणि त्यांच्या मित्र पक्षातील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडीतील आता हेवेदावे लपून राहिले नाहीत. कधी शरद पवार बोलतात तर कधी अजित पवार महाविकास आघाडीच्या विरोधातील मत मांडत असतात त्यामुळे मविआची आघाडी जास्त दिवस टिकेल असं दिसून येत नाही असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ, मोठा भाऊ हे होणारच होतं. ज्यावेळी आमचे 56 आमदार होते त्यावेळी महाविकास आघाडीमधला एक नंबरचा पक्ष होता. मात्र आमची ताकद काय आहे हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना माहिती होतं.

त्यामुळेच 56 वरून आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे आणि त्यांचा दर्जा लहान भावावर घसरला असल्याचे सांगत आता हे वाद रोज होणार आहेत अशी शक्यताही शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. हा वाद कधी ना कधी होणारच होता. त्यामुळे मला यात काही विशेष वाटत नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यांच्या या वादामुळेच महाविकास आघाडी टिकेल अशी कुठलीही चिन्हं आता दिसत नाहीत, कुठल्या छोट्या नेत्याने वक्तव्य करणं ते वेगळं होतं मात्र शरद पवारानंतर आता अजित पवार यांच्याकडूनही तेच वक्तव्य केले जात असेल तर कठीण आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

एकेकाळी जे आमचे नेते होते त्यांचा दरारा होता ज्या मातोश्रीचा दरारा सगळ्या देशात होता त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची काय अवस्था करून घेतली हे बघताना मला खंत वाटते असं मतही त्यांनी ठाकरे गटाविषयी व्यक्त केले आहे.

नोटबंदीचा निर्णय हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसतो हा निर्णय कुठल्याही पक्षाच्या बैठकीत झालेला नाही तर हा निर्णय सर्वस्वी रिझर्व्ह बँकेचा असतो रिझर्व्ह बँकेमध्ये अर्थव्यवस्थेतील अतिशय तज्ज्ञ लोक असतात.

त्यांनी घेतलेला हा निर्णय कुठल्यातरी पक्षाच्या नेत्याने त्यावर भाष्य करणे आणि त्याला राजकीय वळण देणे योग्य नाही हा घेतलेला निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर प्राप्त झालेल्या परिस्थितीनुसार घेतला आहे असंही त्यांनी 2 हजारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी आपले मत सांगितले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...