AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळेंना लागली लॉटरी, भाजपकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून संघटनात्मक नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळेंना लागली लॉटरी, भाजपकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी
Chandrashekhar Bawankule big ResponsibilityImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 14, 2026 | 9:00 PM
Share

भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून संघटनात्मक नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या भाजप संघटनात्मक सहप्रभारी पदी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात बावनकुळेंवर जरांगे पाटील टीकास्त्र सोडत असताना दुसऱ्या बाजूने भाजपकडून बावनकुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरूवात

राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी माजी खासदार हरीश द्विवेदी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत पाच नेत्यांवर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या नेत्यांवर जबाबदारी

पक्षाकडून 14 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार गजेंद्र सिंह पटेल, खासदार संगीता यादव, रोहन गुप्ता आणि दिल्ली सरकारमधील मंत्री रविंद्र इंद्राज सिंह यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

पक्ष संघटनेवर भर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तीला भाजपच्या निवडणूक रणनीतीतील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राजस्थानसाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये विविध राज्यांतील आणि वेगवेगळ्या राजकीय अनुभव असलेल्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावरून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गंभीरतेने पाहत असल्याचे समोर आले आहे.

निवडणुकीच्या संभाव्य तारखा

राजस्थान निवडणूक आयोगाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पंचायत निवडणुकांची घोषणा 23 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार 13 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान अनेक टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. तर 12 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा 17 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. शहरी भागात 6 आणि 9 सप्टेंबर रोजी मतदान, तर 11 सप्टेंबर रोजी मतमोजणी प्रस्तावित आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप