‘अरे आम्ही काय बेअक्कल आहोत का?’, अजित पवार पुण्यात भर कार्यक्रमात प्रचंड संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं. अजित पवार पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कोल्ड वॉरच्या चर्चांवर रोखठोक भूमिका मांडली.

'अरे आम्ही काय बेअक्कल आहोत का?', अजित पवार पुण्यात भर कार्यक्रमात प्रचंड संतापले
ajit pawar
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 1:12 PM

पुणे | 12 ऑगस्ट 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. अजित पवार यांनी परस्पर बैठका घेतल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांच्या या दाव्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी भर कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचा लोकर्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “या कार्यक्रमाला येण्याची खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येण्याची इच्छा होती. कारण ते सुद्धा एकदा या इथल्या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर लगेच त्यांनी आढावा बैठक घेतली होती”, असं अजित पवार म्हणाले.

“चांदणी चौकाने कुणालाच सोडलं नाही. जळवपास सगळ्यांचा कमी-अधिक प्रमाणात वेळ घालवण्याचं काम इथल्या वाहतूक कोंडीने केलं आहे. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊ शकले नाहीत, याची नोंद कृपया पत्रकार मित्रांनी घ्यावी”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

‘मी सत्तेत गेलो त्यात काय चुकलं?’

“अलिकडे रुसून गेले, फुगून गेले, तसंच झालं, आता ते काम करत आहेत, राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचं चांगलं काम सुरु आहे. त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस होते एका बाजूला, दुसऱ्या बाजू मोकळी होती. मी आता तिथे जाऊन उभा राहिलो. आम्ही दोघंही त्यांच्याबरोबर आहोत. त्यात चुकलं काय? राज्याचा सर्वांगिण विकास होत असेल, केंद्रातून नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पैसे देत असतील तर का पैसे घ्यायचे नाहीत? का राज्याचा विकास करायचा नाही?”, असा सवाल अजित पवारांनी केले.

‘अरे तुझ्या का पोटात दुखतंय?’

“दोन दिवसाच्या बातम्या बघा. अजित पवारांनी बैठक घेतली. अरे तुझ्या का पोटात दुखतंय? बैठक घेतली तर काय? सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस हे देखील होते. ते इंडस्ट्रीच्या मीटिंग घेत होते. मी रिसोर्सेस वाढवण्याची मीटिंग घेत होतो. उद्या आपल्याला पैसा द्यायचा असेल तर टॅक्स व्यवस्थित आला पाहिजे, तिथल्या लिकेजेस थांबल्या पाहिजेत”, असं अजित पवार म्हणाले.

“मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे. त्यांना तो सगळा अधिकार आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतला तरी अंतिम निर्णय त्यांचाच आहे. तरीदेखील कोल्ड वार चाललंय. आता कुठे विरोधी पक्ष झाले आणि त्याना कुठे कोल्ड वॉर दिसलं कुणाला माहिती”, असं पवार म्हणाले.

अरे आम्ही काय बेअक्कल आहोत काय?

“एकाला वाटतं की या दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदाच्या एका खुर्चीवर डोळा आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहोत काय? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा ठेवून कसं चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना? व्यक्ती बसलेली आहे. मला हे खरंतर काढायचं नव्हतं. पण काय होतं, आम्ही बोललो नाही तर एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.