AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Gram Panchayat Election Results 2021: ‘या’ गावात आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड; महाविकास आघाडी, भाजपही पराभूत

ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. (ramdas athawale's panel win in gram panchayat election)

Solapur Gram Panchayat Election Results 2021: 'या' गावात आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड; महाविकास आघाडी, भाजपही पराभूत
| Updated on: Jan 18, 2021 | 2:41 PM
Share

सोलापूर: ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, एका ग्रामपंचायत निवडणुकीत या चारही पक्षाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या गटाने धूळ चारली आहे. आठवले गटाच्या या विजयामुळे एकच जल्लोष केला जात आहे. (ramdas athawale’s panel win in gram panchayat election)

रिपाइं नेते रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचं पॅनल उतरवलं होतं. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. गायकवाड यांनी या निवडणुकीचं अचूक नियोजन केलं होतं. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचं काम गायकवाड यांनी केलं होतं. त्यामुळे रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. सोलापुरातील उरलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आठवले गट बॅगेहळ्ळीत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (ramdas athawale’s panel win in gram panchayat election)

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांचा धक्का

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

(ramdas athawale’s panel win in gram panchayat election)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.