आरोग्य विभागाची आज पुन्हा ‘परीक्षा’; गोंधळ टाळण्यासाठी 1364 केंद्रांवर चोख तयारी

Group D Exam | गट क वर्गाच्या पेपरवेळी तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले होते.त्यामुळे गट ड वर्गाची परीक्षा ही एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाने यामध्ये कोणताही बदल केला नव्हता.

आरोग्य विभागाची आज पुन्हा 'परीक्षा'; गोंधळ टाळण्यासाठी 1364 केंद्रांवर चोख तयारी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 7:49 AM

पुणे: गेल्या काही दिवसांपासून अकार्यक्षम व्यवस्थापन आणि तांत्रिक गोंधळामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आरोग्य विभाग रविवारी पुन्हा एकदा ‘परीक्षेला’ सामोरा जाणार आहे. आज राज्यभरात आरोग्य विभागाची गट ड वर्गासाठी परीक्षा पार पडत आहे. 3464 पदांसाठी राज्यभरात 1364 परीक्षा घेण्यात येईल. दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात होईल. यापूर्वीचा अनुभव पाहता निदान आजतरी परीक्षा सुरळीत पार पडणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. गट क परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रावरच ही परीक्षा घेतील जात आहे.

गट क वर्गाच्या पेपरवेळी तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले होते.त्यामुळे गट ड वर्गाची परीक्षा ही एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाने यामध्ये कोणताही बदल केला नव्हता.

विद्यार्थी संतप्त

पुण्यातील आरोग्य विभागाच्या क वर्गाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या नव्हत्या. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते.

गोपीचंद पडळकर यांची टीका

आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परिक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली होती. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील, असे पडळकर यांनी म्हटले होते.

अकरावीला प्रवेश अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस

अकरावीला प्रवेश अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर विद्यार्थ्यांना मुदत वाढवून मिळणार नाही. प्रवेश राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आजच अर्ज करण्याचं शिक्षण विभागाचं आवाहन. पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात 11 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

TET च्या तारखांवर विचार करा, आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची, राजेश टोपेंची वर्षा गायकवाड यांना विनंती, टीईटी पुन्हा लांबणीवर?

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळावरुन भाजप आक्रमक, राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता 24 ऑक्टोबरला; 2 हजार 739 रिक्त पदे भरणार

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.