Maharashtra HSC Results 2022 : धाकधुक वाढली! दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर

| Updated on: Jun 08, 2022 | 1:29 PM

एसएमएस आणि संकेतस्थळाशिवाय टीव्ही 9 डिजीटलवरही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. रिझल्ट आपल्या www.tv9marathi.com वर घोषित होणार आहे. तुम्ही सर्वात आधी आपला निकाल आपल्या संकेतस्थळावर पाहू शकता.

Maharashtra HSC Results 2022 : धाकधुक वाढली! दुपारी एक वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर
बारावीचा निकाल (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे :
बारावी अर्थात एचएससीचा निकाल आज लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Results 2022 Date) याच आठवड्यात लागणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले होते. साधारणपणे 8 किंवा 9 जून रोजी बारावीचा निकाल (HSC Result Live) लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आज (8 जून) हा निकाल जाहीर होणार आहे. निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकतीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. दुसरीकडे ऑनलाइन-ऑफलाइन या गोंधळात विद्यार्थ्यांनी (HSC result News) परीक्षा दिली होती. त्यामुळे आता आजचा निकाल काय लागतो, याची धाकधूक विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील आहे.

एसएमएसद्वारे पाहा निकाल

राज्य शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना मेसेजच्या माध्यमातून तो पाहता येणार आहे. त्यासाठी टाइप करावे लागेल MHHSC आसन क्रमांक त्यानंतर 57766 या नंबरवर तो पाठवावा लागेल. त्यानंतर निकाल तुम्हाला मोबाइलवर पाहता येणार आहे. काही वेळानंतर अधिकृतरित्या संकेतस्थळावरही तो पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसा पाहणार बारावीचा निकाल?

1. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या संकेतस्थळावर जावे

2. संकेतस्थळावरील उपलब्ध रिझल्ट लिंकवर क्लिक करावे

3. आपला रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि शाळेचा कोड टाकून सबमिट करावे

4. त्यानंतर निकाल ओपन होईल

5. विद्यार्थी त्यांचा निकाल स्क्रीनवर पाहू शकतील.

टीव्ही 9 डिजीटलवरही निकाल पाहता येणार

एसएमएस आणि संकेतस्थळाशिवाय टीव्ही 9 डिजीटलवरही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. रिझल्ट आपल्या www.tv9marathi.com वर घोषित होणार आहे. तुम्ही सर्वात आधी आपला निकाल आपल्या संकेतस्थळावर पाहू शकता. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून निकालीची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला tv9 Marathiच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्याठिकाणी आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल मिळणार आहे. यामुळे संकेतस्थळ हँग झाले किंवा रांगेत ताटकळत उभे राहून निकालाची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. tv9 marathiच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि काही क्षणात निकाल मिळवा.