उद्या भाऊबीज, पंकजाताईंकडून शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात, अजूनतरी नाही पण …

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. संपूर्ण पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गाठीभेटी पार पडल्या. यानंतर मीडियाशी बोलताना पंकजाताईंकडून अद्याप तरी दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. 

उद्या भाऊबीज, पंकजाताईंकडून शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात, अजूनतरी नाही पण ...
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

बारामती (पुणे) :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. संपूर्ण पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गाठीभेटी पार पडल्या. यानंतर मीडियाशी बोलताना पंकजाताईंकडून अद्याप तरी दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदाही साजरा झाला. या कार्यक्रमाला अजित पवार यांचा अपवाद वगळता संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. तर राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गोविंदबागेकडे गर्दी केली होती. मंत्री धनंजय मुंडेंनीही आज सकाळी लवकरच पवारांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, असं सांगितलं.

‘अजूनपर्यंत तरी शुभेच्छा आल्या नाहीत’

पवारांसाहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थनाही केली, असं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी, ‘बहिणीकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा आल्या का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, ‘अजूनपर्यंत तरी शुभेच्छा आल्या नाहीत. तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा’, असं म्हणत त्यांनी पत्रकारांची फिरकीही घेतली.

शरद पवार हे शक्तीपीठ आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आम्ही तो कधीही यशस्वी होणार नाही त्यासाठी वाटेल ते करु, पण पवारसाहेबांवर होणारे वैयक्तिक हल्ले रोखू, असं धनंजय मुंडे म्हणाले. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण खालच्या पातळीला जाऊन ते आरोप प्रत्यारोप होऊ नयेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

गोविंदबागेत पवारांचा पाडवा, अजितदादांची अनुपस्थिती

प्रथा परंपरेनुसार बारामतीच्या गोविंदबागेत प्रत्ये वर्षी पवार कुटुंबीय हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असतात. तर राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात. एकंदरितच या कार्यक्रमाची आठवडाभर अगोदरच तयारी सुरु असते. प्रत्येक वर्षी हा अजितदादांच्या अचूक नियोजनाखाली पार पडतो. पण या वर्षी तेच कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. याच चर्चांवर शरद पवार यांनी खुलासा केला.

अजितदादांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण, धोका नको म्हणून दादांनी येणं टाळलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोना झाल्याने अजितदादांनी आजच्या कार्यक्रमाला येणं टाळलं. ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्यानंतर अजितदादांनीही कोरोना टेस्ट केलीय. त्यांचा कोरोना अहवाल येणं अद्याप बाकी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दोन चालक आणि तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत. त्यांच्याही टेस्ट केल्या गेल्या आहेत. त्यांनीही कोरोनाची शक्यता वर्तवली आहे. आज इतके सारे लोक येणार, भेटीगाठी घेणार, उगीच धोका नको म्हणून ते आज कार्यक्रमाला आले नाहीत, असं पवारांनी सांगितलं.

हे ही वाचा :

शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही; राणेंची जोरदार बॅटिंग

नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला, विनायक राऊत यांचा हल्लाबोल

ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, माझं चॅलेंज आहे; चंद्रकांत पाटील यांचा दावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI