AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील पब संस्कृती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

पुण्यातील कल्याणीनगर अपघातामुळे पब आणि बार देखील चर्चेत आले आहेत. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे दारु विक्री होते. परवानाशिवाय पब सुरु आहेत. या पब संस्कृतीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात आंदोलन केले आहे.

पुण्यातील पब संस्कृती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 25, 2024 | 7:28 PM
Share

पुण्यातील पब संस्कृती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी मनसेकडून एक सही संतापाची आंदोलन सुरु आहे. पुण्याच्या गुडलक चौकात मनसेकडून आंदोलन सुरू आहे. हिट अँड रन प्रकरणामुळे पब संस्कृती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. त्यामुळे मनसेने याविरोधात आंदोलन केले आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण चर्चेत आल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले होते. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला लगेचच जामीन मिळाला होता. पण त्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण चर्चेत आल्याने दबाव वाढला. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची दखल घेतली.

या प्रकरणात मुलगा, वडील आणि आजोबा असे तिघे ही जण सध्या तुरुंगात आहेत. मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला गाडी दिल्याने वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. वडील विशाल अग्रवाल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दुसरीकडे आजोबांनी हा गुन्हा आपल्या अंगावर घ्यावा म्हणून त्यांच्या ड्राईव्हरवर जबरदस्ती केली आणि त्याला दोन दिवस डांबून ठेवल्याने सुरेंद्र अग्रवाल यांना देखील अटक झाली असून कोर्टाने त्यांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याणीनगर पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बारवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात केले आहेत. त्यातील बरेच पब आणि बार बंद करून सील करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सांगितले की, कल्याणी नगर अपघाताच्या घटनेनंतर 49 पब आणि बारवर कारवाई करण्यात आलीये. घटनेच्या आधी एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 57 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात 257 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कारवाई मध्ये 1 कोटी 12 लाख रुपयांच दंड देखील वसूल करण्यात आला आहे. विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बार वर कारवाई करण्यात येत असून ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी