महाराष्ट्र अंधत्व मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज – राजेश टोपे

महाराष्ट्र अंधत्व मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - राजेश टोपे
Inauguration of Annual Conference of Poona Ophthalmological Society

कोविड साथीचा धोका कमी झा​ला तरी मास्क वापरण्याची सवय जाता कामा नये .कोविड मुळे डोळ्यांच्या समस्या देखील निर्माण झाल्या.   अशावेळी नेत्र तज्ञ आणि पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या नेत्रोपचाराचे योगदान महत्वपूर्ण आहे .नेत्रपटल दानाचे प्रमाण वाढायला हवे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 11, 2021 | 7:22 PM

पुणे- नेत्रोपचार करणाऱ्या दवाखान्यांना ‘डे केअर सेंटर ‘ म्हणून नोंदणीची मान्यता मिळण्यासाठी सध्याच्या कायद्यात सरकार बदल करेल. डोळे हे ज्ञानेंद्रिय असल्याने नेत्रदानाचा प्रसार व्हायला हवा. मरणोत्तर नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी परवानगीची प्रक्रिया सोपी केली जात आहे. अंधत्व कमी करण्यात यश मिळत आहे. आगामी वर्षात ते आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

त्यासाठी अंधत्व मुक्त महाराष्ट्र उद्दिष्टासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे . तपासणीसह ,प्रतिबंधात्मक उपायांवर आपण भर द्यायला हवा .मिशन मोड वर काम करण्याची गरज आहे . मोबाईल सारख्या उपकरणाच्या वाढत्या वापराने दृष्टीवर परिणाम होत आहे .अशावेळी लहान मुलांना मोफत चष्मे मिळावेत ,यासाठी सरकार प्रयंत्न करीत आहे . या परिषदेने चांगल्या सूचना सरकारला कराव्यात ,त्याची नोंद घेतली जाईल,असेही ते म्हणाले आहेत.

समजावून सांगून मगच शस्त्रक्रिया करा ‘कोविड साथीचा धोका कमी झा​ला तरी मास्क वापरण्याची सवय जाता कामा नये .कोविड मुळे डोळ्यांच्या समस्या देखील निर्माण झाल्या.   अशावेळी नेत्र तज्ञ आणि पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या नेत्रोपचाराचे योगदान महत्वपूर्ण आहे .नेत्रपटल दानाचे प्रमाण वाढायला हवे.नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.रुग्णांना ते समजून सांगून मगच शस्त्रक्रिया केल्या पाहिजेत, असे मत डॉ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या ‘पी.ओ.एस.स्पेक्ट्रम 2021 ‘ या वार्षिक परिषदेचे उद्घाटन,  रॉयल कॅनॉट बोट क्लब पुणे येथे झाले.उदघाटनाच्या सत्रात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिषदेला ऑनलाइन संबोधित केले.उद्घाटन समारंभासाठी पद्मश्री डॉ तात्याराव लहाने,ब्रिगेडियर डॉ.एन एस मणी उपस्थित होते.

नेत्र तज्ञांचा गौरव

या परिषदेमध्ये डॉ विश्वास डाके यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला .शुभदा नारायण कुलकर्णी गुणवत्ता सन्मान डॉ मदन फडणीस यांना देण्यात आला .डॉ मधुसूदन झंवर पुरस्कार डॉ सीमा खैरे यांना देण्यात आला .कै आशा केळकर पुरस्कार डॉ किशोर पाहुजा यांना देण्यात आला . साहेबराव सत्यवती मदान स्मृती पुरस्कार डॉ जीवन लाडी यांना तर डॉ विजय जठार पारितोषिक डॉ क्षितीज तांबोळी यांना देण्यात आले . ​निखील मसुरकर यांचाही सत्कार करण्यात आला .​परिषदेला एकूण 400 नेत्र तज्ञ उपस्थित होते .

राज्यात मविआ सरकारनं अराजक माजवलं, ‘सामना’तील टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

Jitendra Awhad : दलालांनो, परीक्षार्थी उमेदवारांचे पैसे परत करा, तुमचे काम होऊ देणार नाही; आव्हाडांचा इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें