MPSC Result : कराडचा प्रसाद पहिल्याच प्रयत्न राज्यात पहिला, STI मानसी पाटील महिलांमध्ये अव्वल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला आहे. या निकालात कराडच्या प्रसाद चौगुलेने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर मानसी पाटील राज्यात पहिली आलीय.

MPSC Result : कराडचा प्रसाद पहिल्याच प्रयत्न राज्यात पहिला, STI मानसी पाटील महिलांमध्ये अव्वल
प्रसाद चौगुले आणि मानसी पाटील
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 9:32 AM

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) अंतिम सुधारित निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला आहे. या निकालात कराडच्या प्रसाद चौगुलेने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर मानसी पाटील राज्यात पहिली आलीय. दोन वर्षानंतर निकाल जाहीर झाल्याने मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विद्येचं माहरघर असलेल्या पुण्यात एमपीएससीच्या निकालाने रात्री दिवाळीसारखं वातावरण पाहायला मिळालं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएससीने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एमपीएससी 413 पदांच्या निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रसाद चौगुले राज्यात पहिला आलाय. तर अगोदरच एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेल टॅक्स इन्स्पेक्टरपदी कार्यरत असणाऱ्या मानसीला या परीक्षेतही उज्वल यश मिळालं. परिश्रम आणि अभ्यासाचं योग्य नियोजन केल्याने यश मिळाल्याची भावना दोन्ही यशवंतांनी व्यक्त केली.

प्रसाद चौगुले पहिल्याच प्रयत्नात राज्यात पहिला

मुळचा कराडचा असलेल्या प्रसाद चौगुलेने इंजिनिअरींचं शिक्षण घेतलंय. नंतरही एका मल्टीनॅशनल कंपनीत एक वर्ष नोकरीही केली. पण नंतर स्पर्धा परीक्षेचा डोक्यात विचार आला आणि त्याने तयारी सुरु केली. पुण्यात येऊन अधिकारी होण्याचं स्वप्न रंगवलं. आठ ते दहा तास अभ्यास, परीक्षेच्या तोंडावर योग्य नियोजनाने यश मिळाल्याची भावना, प्रसादने व्यक्त केली.

माझे वडील महावितरणमध्ये ऑपरेटर पदावर होते. दोन वर्षांपूर्वी ते रिटायर झाले. घरात शैक्षणिक वातावरण होतं. दोन्ही मोठ्या बहिणी इंजिनिअर होत्या. त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. घरातूनही मला नेहमी पाठिंबा होता. आज निकाल लागलाय. राज्यात पहिला आलोय. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरल्याचा मनोमन आनंद होतोय, अशा भावना प्रसादने व्यक्त केल्या.

मानसी पाटील मुलींमध्ये राज्यात पहिली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मानसी पाटील ही महिला उमेदवारांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. मानसी पाटील हिच्या यशानंतर तीच सर्वत्र कौतुक होतंय. मानसी सध्या नाशिकमध्ये सेल टॅक्स इन्स्पेक्टरपदी कार्यरत आहे. यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये मानसी राज्यात दुसरी आली होती. मात्र आता सुधारित निकालामध्ये मानसी 420 मुलींमध्ये राज्यात प्रथम आली आहे.

(Maharashtra public Service Commission Declared Final result Prasad Chaugule became First in maharashtra And Manasi Patil became First in Among Girl)

हे ही वाचा :

MPSC Result: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर, एमपीएससीच्या निर्णयानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.