AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं, वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; ‘तु पांढऱ्या पायाची आहे’ म्हणत विवाहितेसोबत भयंकर कृत्य

पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका विवाहितेची मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

पुणे हादरलं, वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; 'तु पांढऱ्या पायाची आहे' म्हणत विवाहितेसोबत भयंकर कृत्य
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 25, 2025 | 4:10 PM
Share

पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत तिचा जीव वाचला आहे. त्यानंतर विवाहितने दाखल केलेल्या तक्रारीवरून पती, सासू  आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार तीचं अजय पवार यांच्याशी 22 मे 2022 रोजी लग्न झालं, लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यातच अजय पवारने घरगुती कारणावरून आपल्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केली, यानंतर सासूने देखील पीडितेला  “तु माहेरावरुन काय आणले आहेस?  तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही” असं म्हटलं.

त्यानंतर पती अजय पवार हा देखील पीडितेला “मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे, मला चारचाकी गाडी घेवून देण्यास सांग तुझ्या बापाला,” असं म्हटंला. पीडितेनं गाडी घेऊन देण्यास नकार दिला.  दरम्यान गाडीला नकार दिल्यानंतर पतीने आपला गळा दाबून मारहाण केली, तसेच दीर मनोज पवार याने देखील आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप या घटनेतील पीडितेनं केला आहे.

21 मे रोजी पीडितेच्या सासूने पुन्हा एकदा तिला त्रास दिला, “पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन,” अशी धमकी सासूने तिला दिली. “तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही तू घरात आल्यापासून शांतता नाही,” असं हिणवलं. हा त्रास सहन न झाल्याने या तरुणीने रागाच्या भरात झुरळ मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत या पीडितेचा जीव वाचला आहे, त्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात पीडितेचा पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती या प्रकरणात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान 16 मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या तरुणीने गाळफास घेऊन आत्महत्या केली, या प्रकरणात तिचा पती, सासरा, सासू आणि दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?