पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापौरांची मोठी घोषणा

स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला (Coaching Class) परवानगी देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. | Murlidhar Mohol

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापौरांची मोठी घोषणा
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

पुणेपुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी मोठी घोषणा केली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला (Coaching Class) परवानगी देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. (Mayor Murlidhar mohol big announcement for students preparing for competitive exams in Pune)

कोचिंग क्लासेसला परवानगी

स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच येत्या 21 तारखेला पूर्व परीक्षा देखील होणार असल्याची घोषण आयोगाने केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या कोचिंग क्लासेसला परवानगी देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचाच सुरु असलेला प्रकोप पाहता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यात कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमपीएससी पूर्व परीक्षा 21 मार्चला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची (MPSC exam) नवी तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. MPSC ची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते.

पुण्यात कोणकोणते निर्बंध?

पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोनाची स्थिती काय?

पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. तीन ते चार महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढतो आहे अर्थात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

(Mayor Murlidhar mohol big announcement for students preparing for competitive exams in Pune)

हे ही वाचा :

Pune Lockdown Latest News : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार

Published On - 12:23 pm, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI