AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : आमदार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं नि गाडी थेट बाणगंगा नदीपात्रात, कसा घडला अपघात?

गोरेंची गाडी तब्बल 70 ते 80 फूट उंचीवरुन खाली कोसळली. पण त्यांच्या गाडीमधल्या एअर बॅग ओपन झाल्या नाहीत.

Special Report : आमदार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं नि गाडी थेट बाणगंगा नदीपात्रात, कसा घडला अपघात?
आमदार गोरे यांच्या गाडीला अपघात
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 24, 2022 | 11:45 PM
Share

सातारा : माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. सातारा जिल्ह्यातल्या फलटणजवळ आमदार गोरे यांची गाडी नदीच्या पुलावरुन खाली कोसळली. गोरे यांच्या गाडीचा अपघात नेमका कशामुळं झाला? माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला सातारा जिल्ह्यातल्या फलटणजवळ भीषण अपघात झालाय. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जयकुमार गोरे यांची गाडी पुण्याहून सातारा जिल्ह्यातल्या दहिवडीकडे जात होती. पण लोणंद ते फलटण दरम्यान असलेल्या एका पुलावर जयकुमार गोरे यांच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. आणि गाडी थेट पुलाचा कठडा तोडून बाणगंगा नदीपात्रात कोसळली.

अपघातानातंतर जयकुमार गोरे कसेबसे गाडीबाहेर आले. आणि त्यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फोन केला. खासदार निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी आमदार गोरे यांना अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात हलवलं.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, मला गोरे यांचा फोन आला. त्यांनी लोकेशन सांगणं शक्य नसल्याचं सांगितलं. 5 ते 6 मिनिटात मी पोहोचलो. 70-80 फुटांवरून गाडी खाली पडली होती. गोरे जिकडे बसतात त्याच बाजूला गाडी पडली होती. गाडीतले सीट्स तुटले होते.

ड्रायव्हर आणि पीएला गंभीर दुखापत होती. गोरे गाडीतून बाहेर आले होते. त्यांनी सर्व कर्मचारी, स्टाफ, सेक्युरिटीला पुढच्या 5 ते 7 मिनिटात हलवलं. शेवटच्या अॅम्बुलन्समधून गोरे साहेब गेले. त्यांच्या 3 बरगड्यांना दुखापत झाली आहे.

आमदार गोरे यांचे ड्रायव्हर आणि स्वीय सहाय्यकाला बारामतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर गोरे यांच्यावर पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार राहुल कुल म्हणाले, मेडिकल पॅरामीटर स्टेबल असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही. ते शुद्धीवर आहेत. त्यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे.

चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानंच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दुसऱ्या गाडीबद्दल काही स्पष्ट झालं नाही. चालकाचं नियंत्रण सुटल्यानंच हा अपघात झाला असावा, असं पोलिसांनी सांगितलं. गोरेंची गाडी तब्बल 70 ते 80 फूट उंचीवरुन खाली कोसळली. पण त्यांच्या गाडीमधल्या एअर बॅग ओपन झाल्या नाहीत. या अपघातातून आमदार गोरे थोडक्यात बचावले. त्यांना अपघातस्थळी मदतही वेळेत मिळाली. त्यामुळं पुढील उपचार लवकर करणं शक्य झालं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच