AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन हळूहळू धावणार.. इतक्याच जागांवर लढण्याचा मनसेचा विचार

मनसेच्या स्थापनेनंतर पुणे महापालिकेतच्या 2012 ची निवडणूक मनसेने लढवली होती. त्यामध्ये त्यांचे 29 नगरसेवक निवडून आले होते. मात्र हाच प्रभाव 2017  च्या महापालिकेत राहिला नाही. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसलेला लढवलेल्या 27 जागांवर त्यांचे केवळ 2  नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मतांची टक्केवारी घसरतच गेलेली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन हळूहळू धावणार.. इतक्याच जागांवर लढण्याचा मनसेचा विचार
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 10:01 AM
Share

 प्राजक्ता ढेकळे , पुणे – शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभागांचा प्रा-रूप आराखडानंतर प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणीस सुरवात झाली . आघाडी करायची की नाही , स्वबळावर निवडणूक लढवायची याचे अंदाज बांधले जात आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी(Municipal elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही(Maharashtra Navnirman Sena) आपले लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी निवडणुकीत(Election)  स्वबळावर निवडणूक लढवताना सर्वच जागा लढवण्यासापेक्षा मनसेचे प्राबल्य असलेल्या जागांवरच उमेदवार देत लक्ष केंद्रित करण्याचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व १७३ ऐवजी ४० जागा लढविण्याबाबतचा विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बैठकांनाही सुरुवात झाली आहे.

 मध्यवर्ती भागांवरच मनसेकडून लक्ष

महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये सर्व जागा लढविण्याऐवजी काही जागांवरच लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे, बाबू वासस्कर, वसंत मोरे, किशोर शिंदे , साईनाथ बाबर, गणेश सातपुते, बाळा शेडगे, योगेश खैरे, रणजित शिरोळे, संतोष पाटील आणि वनिता वागस्कर यावेळी उपस्थित होते. प्रभाग रचनेचा आढावा घेताना पक्षाचे प्राबल्य असलेल्या जागांवरच उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार जवळपास चाळीस जागा समितीकडून निश्चित करण्यात आल्या आहेत. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगरसह मध्यवर्ती भागांवरच मनसेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांची संख्या मनसेच्या स्थापनेनंतर पुणे महापालिकेतच्या 2012 ची निवडणूक मनसेने लढवली होती. त्यामध्ये त्यांचे 29 नगरसेवक निवडून आले होते. मात्र हाच प्रभाव 2017  च्या महापालिकेत राहिला नाही. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसलेला लढवलेल्या 27 जागांवर त्यांचे केवळ 2  नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मतांची टक्केवारी घसरतच गेलेली आहे. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून युती करेल अश्या चर्चाही रंगल्या जात आहेत. मात्र याबबातच अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेणारा असल्याचे समजत आहे. तसेच मर्यादित जागा लढविण्याबाबतची निर्णयही स्पष्ट होणार आहे.

Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!

Nana Patole | अर्थहीन बजेटमुळे देशाला पुन्हा डबघाईस नेण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन : नाना पटोले

Gupt Navratri 2022 | आज पासून आईचा जागर , गुप्त नवरात्रीला सुरुवात, पण चुकूनही ही कामे करु नका

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.