AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Municipal Corporation| पुणे महानगरपालिकेचा प्रा-रूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच फूटला , अन… उडाला एकच गोंधळ ; नेमकं काय झालं?

वेळेपूर्वीच प्रभागाच्या नावांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्याची चुक लक्षात येताच महानगरपालिकेने अवघ्या काही मिनिटातच यादी संकेतस्थळावरून हटवली. मात्र महापालिका संकेत प्रभाग नावे जाहीर झाल्यामुळे निवडणूक विभागातच मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे.

Pune Municipal Corporation| पुणे महानगरपालिकेचा प्रा-रूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच फूटला , अन... उडाला एकच गोंधळ ; नेमकं काय झालं?
PMCImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 4:04 PM
Share

प्राजक्ता ढेकळे, पुणे – पुणे महानगरापलिकेच्या(Pune Municipal Corporation)प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध होणार आहे. मात्र हा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच पुणे महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर कालच (सोमवारी) प्रसिद्ध झाल्याने एकच गोंधळ उडाला. महानगरपालिकेच्या आयटी विभागाकडून प्रा-रूप प्रभाग रचनेचा आराखडा (Ward Formation)प्रकाशित करण्याचे काम सुरु असतानाचा आराखडा अचानक प्रसिद्ध झाला. प्रभागाची नावे संकेतस्थळ जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सर्वत्र ही नावे व्हायरल झाली. यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले. राज्य निवडणूक आयोगाच्या(State Election Commission) आदेशानुसार आज प्रभाग रचनेचा कच्चा प्रा रूप आराखडा प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. संकेतस्थळावर अचानक प्रसिद्ध झालेलया आराखाड्यात एकूण 58 प्रभागांची यादी पाहायला मिळली.

ही आहेत प्रभागांची नावे

1. धानोरी – विश्रांतवाडी, 2. टिंगरेनगर – संजय पार्क, 3. लोहगाव – विमान नगर, 4. वाघोली – इऑन आयटी पार्क,5. खराडी – चंदननगर 6. वडगावशेरी, 7. कल्याणीनगर – नागपूर चाळ,8. कळस – फुलेनगर,9. येरवडा, 10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, 11. बोपोडी – पुणे विद्यापीठ 12. औंध – बालेवाडी, 13. बाणेर – सुस म्हाळुंगे, 14. पाषाण – बावधन बुद्रुक, 15. पंचवटी – गोखलेनगर, 6. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे, 17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर, 18. शनिवार वाडा – कसबा पेठ, 19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल, 20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड, 21. मुंढवा – घोरपडी, 22. मांजरी – शेवाळवाडी, 23. साडेसतरानळी – आकाशवाणी, 24. मगरपट्टा – साधना विद्यालय, 25. हडपसर गावठाण – सातववाडी, 26. भीमनगर – रामटेकडी, 27. कासेवाडी – हरकानगर, 28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट, 29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई, 30. जयभवानी नगर – केळेवाडी, 31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर, 32. भुसारी कॉलनी – सुतारदरा, 33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी, 34. वारजे – कोंढवे धावडे, 35. रामनगर – उत्तमनगर शिवणे, 36. कर्वेनगर, 37. जनता वसाहत – दत्तवाडी, 38. शिवदर्शन – पद्मावती, 39. मार्केटयार्ड – महर्षी नगर, 40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क, 41. कोंढवा खुर्द – मिठानगर, 42. सय्यदनगर – लुल्लानगर, 43. वानवडी – कौसरबाग, 44. काळेपडळ – ससाणेनगर, 45. फुरसुंगी, 46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची, 47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी 48. अप्पर सुपर दिरानगर, 49. बालाजीनगर – के के मार्केट, 50. सहकारनगर – तळजाई, 51. वडगाव – पाचगाव पर्वती , 52. नांदेडसिटी – सनसिटी, 53. खडकवासला -नऱ्हे, 54. धायरी – आंबेगाव, 55. धनकवडी – आंबेगाव पठार, 56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ, 57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर, 58. कात्रज – गोकुळनगर

 यादी संकेतस्थळावरून हटवली

वेळेपूर्वीच प्रभागाच्या नावांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्याची चुक लक्षात येताच महानगरपालिकेने अवघ्या काही मिनिटातच यादी संकेतस्थळावरून हटवली. मात्र महापालिका संकेत प्रभाग नावे जाहीर झाल्यामुळे निवडणूक विभागातच मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. ही यादी नेमकी कशी जाहीर झाली, कोणी जाहीर केली याबाबत सायबरसेलकडे तक्रार करणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख यांनी दिली आहे.

इथे पाहता येणार प्रारूप प्रभाग रचना आराखडा

आज प्रसिद्ध होणाऱ्या प्रा- रूप प्रभाग रचना नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहतायेणार असल्याची माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख यांनी दिली आहे. या बरोबरच महानगर पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरही प्रभाग रचना पाहता येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचनाही मागवण्यात येणार असल्याचेहीत्यांची सांगितले आहे. येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत या सूचना व हरकती स्वीकारल्या जाणारही आहेत.

Zodiac | नशीब सोन्यासारखे चमकेल, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास

इकडे किराणा दुकानात वाईनची घाई, पण लातूरच्या या गावात तर असल्या प्रकाराला एंट्रीच नाई.. काय घेतला ठराव?

ZP Elections | राज्यातल्या जि. प. निवडणुकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात, औरंगाबादसह पाच जिल्ह्यांच्या याचिका काय?

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.