AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलच्या व्यसनाने हे काय केले, संतापाच्या भरात मुलाने केला आईचा खून

तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तस्लीम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांना संशय आला.

मोबाईलच्या व्यसनाने हे काय केले, संतापाच्या भरात मुलाने केला आईचा खून
| Updated on: Feb 18, 2023 | 9:34 AM
Share

पुणे : आपल्या मुलांनी मोबाईलच्या (mobile addiction)आहारी जाण्यापुर्वीच पालकांनी सावध व्हायला हवे. अन्यथा मोबाईलचे हे व्यसन चांगलेच महागात पडू शकते. पुणे जिल्ह्यातील (pune crime news) या घटनेमुळे मोबाईलसंदर्भात मुलांचे लाड करणाऱ्या पालकांचे डोळे उघडले असतील. अभ्यास करताना मोबाईल पहात असलेल्या मुलाला आईने रागवले. त्यानंतर मुलाने आईला भिंतीवर ढकलून देऊन गळा दाबून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यासंदर्भात पोलिसांना आधी चुकीची माहिती दिली गेली. परंतु तपासानंतर वेगळाच प्रकार समोर आला.

नेमका काय आहे प्रकार

पुणे जवळील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार रोड परिसरात तस्लीम जमीर शेख आपल्या पती व एका मुलासोबत राहत होत्या. तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तस्लीम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांना संशय आल्याने तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन केले. त्यात गळा दाबून व डोक्याला जखम झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी खुनाच्या संशयाने सुरु केला तपास

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खून झाल्याच्या संशयातून करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात कोणी माहिती देण्यास तयार नव्हते. ही तस्लीमचे पती जमीर आणि मुलगा जिशान यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मुलाने घडलेली घटना सांगितली. जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. जिशान हा बारावीला आहे. अभ्यास करताना मोबाईलवर पहात बसला होता. ते पाहून आई रागवली. जिशानच्या गालावर चापट मारली. त्यानंतर जिशानने तिला भिंतीवर ढकलले व तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला.

वडिलांना खोटे सांगितले

जिशानने ब्लेडने तस्लीमचे मनगट कापले. परंतु रक्त आले नाही. त्यामुळे तो घाबरला. त्याने वायर फॅनला अडकवली व आईने गळफास घेतल्याचा बनाव तयार केला. वडील घरी आल्यावर त्याने त्याला हिच माहिती दिली. त्यानंतर तस्लीम यांना जवळच्या रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनात खूनाचा प्रकार समोर आला. 15  फेब्रवारी रोजी ही घटना घडली होती. परंतु पोलिसांच्या तपासानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी जिशान जमीर शेख (वय १८) याला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी फिर्याद दिली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.