AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी खासदार संजय काकडेच्या पत्नीचे टोकाचं पाऊल, प्रकृती गंभीर

उषा काकडे, माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी, यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

माजी खासदार संजय काकडेच्या पत्नीचे टोकाचं पाऊल, प्रकृती गंभीर
Sanjay KakadeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 8:32 PM
Share

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उषा काकडे यांनी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. उषा काकडे या ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात.

संजय काकडे यांचा अल्पपरिचय

संजय काकडे हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार होते. अपक्ष खासदार म्हणून संजय काकडेंनी भाजपला केंद्रात पाठींबा दिला होता. संजय काकडे यांचे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय काकडे यांची निर्णायक भूमिका असते. संजय काकडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.

पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे. संजय काकडे हे मूळचे बांधकाम व्यवसायिक आहेत. १९८६ पासून त्यांनी रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठं काम केलं आहे. ‘संजय काकडे ग्रुप’ या नावाने त्यांची कंपनी आहे. 2017 मध्ये संजय काकडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुणे महानगर पालिकेची जबाबदारी दिली होती. तेव्हापासून त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली. काकडेंनी पुण्याचं स्वतःचे कौशल्य वापरुन भाजपला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून त्यांची एक राजकीय अभ्यासक म्हणून ओळख निर्माण झाली.

लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पुन्हा एकदा जबाबदारी दिली. तीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. काकडे यांना बांधकाम क्षेत्रातील मोठा अनुभव असल्याने त्यांच्या सहकार्याने सरकारने टेंडर प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले. काकडेंच्या अभ्यासू वृत्तीमुळे पुणे मनपाचे ८०० कोटी वाचल्याचा दावा केला जातो. संजय काकडे यांना पक्षाने राज्यसभेवर जाण्याची संधी दिली होती. त्या काळात त्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये पक्षासाठी काम केलं. मात्र मागच्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येतं.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण