mpsc exam | एकाच दिवशी तीन स्पर्धा परीक्षा, कोणता पेपर देऊ… विद्यार्थ्यांसमोर संकट

mpsc exam | सरकारी सेवेते जाण्याचे स्वप्न राज्यातील अनेक तरुण पाहत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी रात्रंदिवस करत असतात. यंदा ही तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिहेरी धक्का बसला आहे. एकाच दिवशी तीन परीक्षा आल्या आहेत.

mpsc exam | एकाच दिवशी तीन स्पर्धा परीक्षा, कोणता पेपर देऊ... विद्यार्थ्यांसमोर संकट
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 8:42 AM

पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीपासून रात्रंदिवस मेहनत करत असतात. स्पर्धा परीक्षेचा अर्ज दिलेल्या तारखेत भरतात. त्याच दरम्यान दुसऱ्या परीक्षेची जाहिरात येते. त्याचाही अर्ज आणखी एक संधी म्हणून भरला जातो. परंतु या परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांची ही संधी जाते. आता तीन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे कोणता पेपर द्यावा…असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. या परीक्षांचा तारखा बदलण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

कोणत्या तीन परीक्षा एकाच दिवशी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परीक्षा येत्या २९ ऑक्टोबर रोज होत आहे. त्याच दिवशी आणखी दोन परीक्षा होणार आहे. एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसोबत नगरपरिषद भारती परीक्षा आणि महाज्योतीतर्फे यूपीएससी प्रशिक्षणार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षाही २९ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. तीन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी दोन परीक्षेला मुकणार आहे. यामुळे परीक्षेच्या वेळा पत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांनी केला सर्वच परीक्षांचा अभ्यास

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी तीन परीक्षांचे अभ्यास केला. परंतु तीन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे त्यांची संधी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमपीएससी परीक्षेचे वेळापत्रक आधीच निश्चित असते. त्यामुळे महाज्योती आणि नगरपरिषद भरतीच्या परीक्षेची तारीख बदलावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

सर्व संस्थांमध्ये समन्वयाची गरज

राज्यातील तीन संस्था २९ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेत आहेत. यामुळे परीक्षेची तारीख निश्चित करताना इतर संस्थांनी त्याच दिवशी पेपर घेतला आहे का? हे निश्चित करण्यासाठी विविध संस्थांमध्ये समन्वय होण्याची गरज आहे. एमपीएससीचे वेळापत्रक निश्चित असताना तो दिवस सोडून इतर दिवशी इतर संस्थांनी पेपर निश्चित केला असता तर विद्यार्थ्यांची संधी गेली नसती. यामुळे दोन परीक्षांच्या तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.