गडकरींच्या हस्ते स्वप्निलला पारितोषिक, अजित पवारांच्या बैठकीलाही हजर, स्वप्निलची आई म्हणते, सगळं सरकार आंधळं!

स्वप्निलच्या आई म्हणाल्या, सगळं सरकार आंधळंय, भाजप सरकार आंधळंय, मोदी सरकार आंधळंय, आघाडी सरकार आंधळंय, सगळं सरकार आंधळंय.

गडकरींच्या हस्ते स्वप्निलला पारितोषिक, अजित पवारांच्या बैठकीलाही हजर, स्वप्निलची आई म्हणते, सगळं सरकार आंधळं!
Swapnil Lonkar family blames gov.
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 9:44 AM

पुणे : पुण्याच्या स्वप्निल लोणकरनं आत्महत्या केलीय. (Pune MPSC Swapnil Lonkar Suicide) तो एमपीएससीच्या पहिल्या दोन्ही परीक्षा पास झालेला होता. आणि मुलाखतीसाठी दोन वर्ष वाट पहात होता. एकीकडे वाट पहाण्याची सजा आणि दुसरीकडे कुटुंब आर्थिक विवंचनेत अशा दुहेरी संकटात तो सापडला आणि त्यातच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर स्वप्निलच्या आईनं मात्र सरकारला कटघऱ्यात उभा करत, माझ्या स्वप्निलसारखे कित्येक स्वप्निल अशाच अवस्थेत आहेत, त्यांना वाचवा अशी आर्त विनवणी सरकारला केलीय.

सगळी सरकारं आंधळी! स्वप्निलच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबात आई, वडील, बहिण आहे. लॉकडाऊनमध्ये धंदा बसलाय. डोक्यावर कर्जही आहे. हातावर पोट असलेलं कुटुंब आहे. पण अशाही स्थितीत आणखी कोणत्या स्वप्निलचा बळी जाऊ नये म्हणून ते प्रयत्न करतायत. एमपीएससीचा कारभार, सरकारची त्याबद्दलची उदासिनता याबद्दल स्वप्निलच्या कुटुंबियांच्या मनात राग आहे. स्वप्निलच्या आई म्हणाल्या, सगळं सरकार आंधळंय, भाजप सरकार आंधळंय, मोदी सरकार आंधळंय, आघाडी सरकार आंधळंय, सगळं सरकार आंधळंय.

मंत्र्यांच्या मुलांना नाही गरज लागत! स्वप्निलच्या आईचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अश्रू थांबत नव्हते. तशाही अवस्थेत त्या म्हणाल्या- मला सगळ्या सरकारला दोष द्यायचाय. ते फक्त त्यांचं स्वत:चं बघतात. सरकारला नाही जाग येत. अशी कित्ती कित्ती मुलंयत. गरीब कुटुंबातलीच मुलं पहातात हो ही स्वप्न. मोठ्यांना नाही गरज लागत. मंत्र्यांच्या मुलांना नाही गरज लागत अशा स्वप्नांची. त्यांना आपोआप सगळं मिळतं हो. गरीबांचीच मुलं इथपर्यंत पोहोचतात कष्ट करुन.

गडकरींच्या हस्ते सत्कार, अजित पवारांच्या बैठकीलाही स्वप्निल लोणकर हा हुशार होता. कोरोनाच्या काळातही तो सामाजिक कार्यात सक्रिय होता. स्वप्निलच्या आईंनी सांगितलं की- त्याला दिल्लीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पारितोषीक मिळालं होतं. तो पोलीस मित्राचं काम करत होता. त्यानं एक नाही दोन नाही तर प्लेट लेट डोनेशन सत्तावीस वेळेस केलेलं होतं. त्याला शंभर जणांचे जीव वाचवायचे होते. कोरोनाग्रस्तांना प्लाज्मा डोनेशन मिळावं म्हणून तो रात्र रात्र जागं असायचा. महाराष्ट्राबाहेर त्याचे फोन व्हायचे. मी त्याला म्हणायचे, अरे स्वप्निल तुला भाजीपाल्यागत प्लाज्मा मागत्यात लोकं, त्यानं, त्याच्या मित्रानं इंजेक्शन उपलब्ध केले. ऑक्सिजन केलं. इथं जी अमोल कोल्हे, अजित पवार यांची बैठक झाली होती, तिसऱ्या लाटेसाठीची. तिच्यातही तो होता. त्याच्यात चर्चा झाली की आपण हे कसं रोखू शकतो. लहान मुलांना कसा त्रास नको. इथपर्यंत तो मुलगा हुशार होता. पण एवढ्या एका कारणामुळे तो टोकाचं पाऊल उचलतोय. बरं आज माझ्या स्वप्निलसारखी किती मुलं असतील. की त्यांच्या मनात काय काय चाललं असल? की आम्ही काय करु? आमच्या कुटुंबासाठी काय करु? प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी जगतो. (Swapnil Lonkar commits suicide his family angry about Governments)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.