AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ आला होता, पण..! दुचाकीला चुकवताना खासगी बस झाली पलटी; वेळीच मदत पोहचली म्हणून…

सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून बस काढण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आहे. बस काढपर्यंत महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती.

काळ आला होता, पण..! दुचाकीला चुकवताना खासगी बस झाली पलटी; वेळीच मदत पोहचली म्हणून...
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 11:58 PM
Share

पुणे : मुंबई ते निजामबाद असा प्रवास करणाऱ्या खासगी बसला पुणे-सोलापूर हायवेवर यवतजवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर बस पलटी झाली, त्यामुळे बसमधील प्रवाशांनी जोरदार आरडाओरड सुरू केला होता. खासगी बसचा अपघात झाल्यामुळे बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या झालेल्या भीषण अपघातात 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाल्याचे कळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. अपघातानंतर या महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती.

मुंबईहून तेलंगणाला जाणाऱ्या खाजगी बसला यवतजवळ अपघात होताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बस अचानक पलटी झाल्याने बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर प्रवाशांना तात्काळ मदत करून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातामध्ये 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईहून तेलंगाना जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला असला तरी त्या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

या अपघातातील जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांची एक टीम तैनात करण्यात आली असून त्यांच्या तात्काळा उपचार सुरु करण्यात आले आहेत. मोटारसायकलला धडक लागू नये म्हणून चालकाने ब्रेक लावल्याने बस बाजूला पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर पोलिसांनी आणि नागरिकांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून बस काढण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आहे. बस काढपर्यंत महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.