‘महायुती टिकावी अशी देवाकडे प्रार्थना; 6 महिन्यांनी काय होईल…’, अजित पवार गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 17, 2024 | 7:52 PM

महायुती टिकून राहावी, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं सुनील शेळके म्हणाले आहेत. तसेच पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही, असंदेखील मोठं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समोरच सुनील शेळके यांनी संबंधित व्यक्त केलं आहे.

महायुती टिकावी अशी देवाकडे प्रार्थना; 6 महिन्यांनी काय होईल..., अजित पवार गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
सुनील शेळके आणि अजित पवार
Follow us on

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचं सरकार आहे. पण ही महायुती स्थानिक पातळीवर कितपत एकत्र आहे? असा प्रश्न निर्माण होण्यासारखं वक्तव्य सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराने केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनील शेळके यांनी आज मावळमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. महायुती टिकून राहावी, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं सुनील शेळके म्हणाले आहेत. तसेच पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही, असंदेखील मोठं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समोरच सुनील शेळके यांनी संबंधित व्यक्त केलं आहे.

सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?

“सहा महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही. महायुती टिकावी, अशी देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो. ही सगळी मंडळी कशी पटापटा भेटतील याचाही मी विचार करतोय. जी लोकं मला सापडत नव्हती. मला पाहिलं की दुसरीकडे जायचे, ते आज सगळे सापडले आहेत. असं उर भरून आलंय की, मिठ्या मारावी”, असं सुनील शेळके म्हणाले.

शेळकेंनी अप्रत्यक्षपणे भाजपला डिवचलं

महायुतीकडून श्रीरंग बारणेंचा प्रचार योग्यरित्या सुरु आहे का? याबाबतही सुनील शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मला ढकलून देण्याचं नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावून ठेवलाय, असं म्हणत सुनील शेळके यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला डिवचलं.

‘मी जे भोगलं ते…’

“माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगलं आहे, ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही. असं म्हणून गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला पटलं नाही, हे शेळकेंनी बोलून दाखवलं. बारणेंच्या प्रचारात शेळकेंनी अशी वक्तव्य केल्यानं महायुतीत अद्याप समन्वय राखला गेलाय का? हा खरा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय.