राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे पुण्यातील 23 नव्या गावांची जबाबदारी

अश्विनी सातव डोके

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2021 | 7:29 AM

संबंधित गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती राष्ट्रवादीतर्फे देण्यात आली.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे पुण्यातील 23 नव्या गावांची जबाबदारी
पुणे महापालिका

Follow us on

पुणे : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे नव्या तेवीस गावांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा (Pune new 23 villages) महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय गेल्या वर्षअखेरीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदेशाने झाला होता. 23 गावांमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (NCP corporators to look after New 23 villages under Pune Municipal Corporation)

पुणे शहर राष्ट्रवादीतर्फे पुढाकार

ही 23 गावं पालिका हद्दीत आल्याने तिथल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आली आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

नगरसेवक काय काम करणार?

संबंधित गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती राष्ट्रवादीतर्फे देण्यात आली.

ती 23 गावे कोणती?

 1. खडकवासला
 2. किरकटवाडी
 3. कोंढवे धावडे
 4. मांजरी बुद्रूक
 5. नांदेड
 6. न्यू कोपरे
 7. नऱ्हे
 8. पिसोळी
 9. शेवाळवाडी
 10. काळेवाडी
 11. वडाची वाडी
 12. बावधन बुद्रूक
 13. वाघोली
 14. मांगडेवाडी
 15. भिलारेवाडी
 16. गुजर निंबाळकरवाडी
 17. जांभूळवाडी
 18. होळकरवाडी
 19. औताडे हांडेवाडी
 20. सणसनगर
 21. नांदोशी
 22. सूस
 23. म्हाळुंगे

उच्च न्यायालयाच्या आदेशानं यापूर्वी 11 गावांचा समावेश

पुणे महापालिकेच्या हद्दीतील 34 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानंतर युती सरकारच्या काळात 11 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यातही आली. उर्वरित गावंही टप्प्याटप्प्यानं महापालिकेत घेण्यात येतील असं शपथपत्रही देण्यात आलं होतं. त्यानंतर ही गावं महापालिकेत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला.

संबंधित बातम्या 

पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय

Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी

(NCP corporators to look after New 23 villages under Pune Municipal Corporation)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI