शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द; कारण गुलदस्त्यात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 28, 2021 | 10:20 AM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी पवार सोलापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांचा दौरा रद्द होण्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. (ncp leader sharad pawar solapur tour cancelled)

शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द; कारण गुलदस्त्यात
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी पवार सोलापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांचा दौरा रद्द होण्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. (ncp leader sharad pawar solapur tour cancelled)

शरद पवार येत्या 2 सप्टेंबर रोजी सोलापुरात येणार होते. आगामी सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार सोलापुरात येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते. तसेच पक्ष संघटनेचा आढावा घेणार होते. मात्र, हा दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

कोठेंचा प्रवेश लांबला

पवारांच्या दौऱ्यात नगरसेवक महेश कोठे यांचा रखडलेल्या पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता पवारांचा दौरा रद्द झाल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशही रखडल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे यांना विभागीय आयुक्तांनी अपक्ष नगरसेवक मान्यता दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या कोटींचा पक्षबदल यानंतरही नगरसेवक पद अबाधित राहणार आहे. पूर्वी काँग्रेस तर आता शिवसेनेचे नगरसेवक असलेले महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.

सोलापूरला दुसऱ्यांदा भेट

पवार दुसऱ्यांदा सोलापूरला येणार होते. या आधी ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरात आले होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र, यावेळी त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या. त्यानंतर ते 2 सप्टेंबर रोजी पक्ष पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणार होते.

सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल

• भाजप 49 • शिवसेना 21, • काँग्रेस 14 • राष्ट्रवादी 04 • MIM – 08 • माकप – 01 • अपक्ष/इतर – 04 • रिक्त – 01 • एकूण = 102 (ncp leader sharad pawar solapur tour cancelled)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: ठाकरे सरकार मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?

जळगावकरांना मोठा दिलासा; गेल्या सव्वा महिन्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

वंचितला धक्का, प्रवक्त्यांसह दोन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अजितदादांची भेट फळाला!

(ncp leader sharad pawar solapur tour cancelled)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI