पुण्यातल्या भाजपमधील नाराजी नाट्यावर नितीन गडकरी यांनी मार्ग काढला, पडद्यामागे काय घडलं?

मेधा कुलकर्णी यांच्या फेसबुक पोस्टनंतर भाजपमधील पुण्यातील अंतर्गत धुसफूस जाहीरपणे समोर आली. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीच्या चर्चांना जोर धरला. अखेर मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली.

पुण्यातल्या भाजपमधील नाराजी नाट्यावर नितीन गडकरी यांनी मार्ग काढला, पडद्यामागे काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 4:50 PM

पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी काल फेसबुकवर पोस्ट टाकून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. आपण जुने आणि सच्चे कार्यकर्ते असूनही पुण्यातील भाजप नेत्यांकडून आपल्याला डावलण्याचं काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर पुणे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफुसीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. मेधा कुलकर्णी यांचं नाराजी असणं भाजपसाठी हिताचं नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: मेधा कुलकर्णी यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली आहे. नितीन गडकरी यांच्याकडून मेधा कुलकर्णी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यात आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम आज पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या परिपत्रक पाहिल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला सातत्याने डावलण्याचं काम पक्षातील काही जणांकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता थेट निशाणा साधला होता. मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीबाबत चंद्रकांत पाटील यांना आज माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नितीन गडकरींना काढली मेधा कुलकर्णी यांची समजूत

दरम्यान, मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीची दखल नितीन गडकरी यांनी घेतली. नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यांनी मेधा कुलकर्णी यांची समजूत काढली. गडकरींनी मेधा यांना पक्षातील वरिष्ठांना भेटून विषय संपवण्याची सूचना केली. त्यानंतर पक्षातील वरिष्ठांच्या कानावर माझी नाराजी टाकली असून वरिष्ठांनी मला वेळ दिल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली. तसेच नितीन गडकरी घरी आल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

“नितीन गडकरी घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिले. वरिष्ठ मला वेळ देणार आहेत . त्या वेळेला मी वरिष्ठांशी बोलणार आहे. यापेक्षा जास्त आज मी काही बोलणार नाही. मला वेळ दिलेली आहे आणि स्वतः गडकरीही आज मला भेटून गेले आहेत”, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

आमदार भीमराव तापकीर यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका

दुसरीकडे भाजपचे खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केलीय. या पुलाचं श्रेय कोण्या एका व्यक्तीचं नाही. हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे. जर जागामालकांनी जागाच दिली नसती तर लवकर झालं असतं का? असा सवाल त्यांनी केला. “हा पुल माझ्या मतदारसंघात येतो. वाहतूक कोंडी झाली की लोक आमच्याकडे येतात. त्या तिकडे राहतात. आम्ही इकडे राहतो. पूल माझ्या मतदारसंघात आहे म्हणून श्रेय घेणार नाही. श्रेयवादापेक्षा काम महत्त्वाचे आहे”, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.