Lonavala : पुण्यात लेव्हल 3 चे निर्बंध, त्यात जमावबंदी आदेश, लोणावळ्यात शुकशुकाट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे.

Lonavala : पुण्यात लेव्हल 3 चे निर्बंध, त्यात जमावबंदी आदेश, लोणावळ्यात शुकशुकाट
Lonavala Bhushi Dam

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे. मावळ तालुक्यातील धबधबे तसेच लोणावळा, खंडाळा या पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते पुणे ग्रामीण पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र या पर्यटनबंदीच्या निर्णयाने हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे पुरते हाल झाले आहेत.

दरम्यान, लोणावळा-खंडाळा पर्यटन स्थळ निर्मनुष्य आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे गर्दी होणारा लोणावळा परिसर सध्या निर्मनुष्य आहे.

पुण्यातील निर्बंधांत सूट देण्याची चर्चा 

पुणे जिल्हा लेव्हल 3 मध्ये असल्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम आहेत. पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय झालेला नाही. तथापि पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत चर्चा करुन   पुढील एक दोन  दिवसात निर्णय घेतील”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?

 1. पुणे
 2. सोलापूर
 3. कोल्हापूर
 4. सांगली
 5. सातारा
 6. रत्नागिरी
 7. रायगड
 8. सिंधुदूर्ग
 9. पालघर
 10. नगर
 11. बीड

संबंधित बातम्या  

Pune Lockdown | कलम 144 लागू असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी  

पुण्यातील निर्बंधात सूट देण्याची चर्चा, एक-दोन दिवसात निर्णय होईल, गृहमंत्र्यांची माहिती    

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात निर्बंधात सूट नाहीच, उलट वाढवले जाणार, काय सुरु, काय बंद?   

25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम; राजेश टोपे यांची घोषणा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI