AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Chandrakant Patil| ‘आता मला नीलम ताईंबद्दल बोलावं लागेल’ ; आता पूर्वीची बीजेपी नाही,खूप स्ट्रॉग झाला – चंद्रकांत पाटील

न्यायालय यावर निर्णय देईल नाही देईल माहिती नाही, पण मी यावर डिबेट घडवून आणेल. महाराष्ट्रात सगळे पायंडे मोडीत काढले जात आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती असणं हे अतिउच्च स्थान आहे तुम्ही त्याची गरिमा बिघडवू नका. तुमच्याकडे सातबारा असेल, पुरावे असतील तर कश्याला धमक्या देता कोर्टात जा कोण घाबरतय. ही पूर्वीची बीजेपी नाही राहिली, खूप स्ट्रॉग झाला आहे

MLA Chandrakant Patil| 'आता मला नीलम ताईंबद्दल बोलावं लागेल' ; आता पूर्वीची बीजेपी नाही,खूप स्ट्रॉग झाला - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 3:05 PM
Share

पुणे  – ‘ मी नीलम ताईंबद्दल काही बोलत नव्हतो ते बोलावं लागेल’ . त्यांना जाणीव असावी त्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. ज्यावेळेला तुम्ही विधानपरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष असता त्यावेळेला तुमचा कोणताही पक्ष नसतो. त्या जर आता उपसभापती असताना शिवसेनेच्या (Shivasena )प्रवक्त्या म्हणून बोलणार असतील तर मी कोर्टात जाईल.न्यायालय यावर निर्णय देईल नाही देईल माहिती नाही, पण मी यावर डिबेट घडवून आणेल. महाराष्ट्रात सगळे पायंडे मोडीत काढले जात आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती असणं हे अतिउच्च स्थान आहे तुम्ही त्याची गरिमा बिघडवू नका. तुमच्याकडे सातबारा असेल, पुरावे असतील तर कश्याला धमक्या देता कोर्टात जा कोण घाबरतय. ही पूर्वीची बीजेपी नाही राहिली, खूप स्ट्रॉग झाला आहे.असे उत्तर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या टीकेला भाजप आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil)यांनी दिले आहे.

बंद केलेल्या केसेस उकरून काढल्या जात आहेत

तुमचाही सातबाऱ्याचा उतारा आमच्याकडे आहे. शिवसेना नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा भाजपला थेट इशारा दिला. उत्तम काम सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायद्याच्या चौकटीत अडकवल जातंय. सगळ्या चौकश्यांना आम्ही सामोरे जातोय. मात्र कुठलेही साक्षी पुरावे नसताना अशा पद्धतीने बेलगाम आरोप केले जात आहेत. तसेच बंद केलेल्या केसेस उकरून काढल्या जात आहेत. राजकारण कुणी कितीही गढूळपणा करण्याचा काम केल तर शिवसेना तुरटी सारखं काम करते हे लक्षात ठेवा. प्रभू श्रीराम आणि सीतेवर सुद्धा आरोप करणारे लोक होते त्यांचाच वारसा भाजपवाले चालवत आहेत अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर केली होती.

राजकीय संवाद घडवून आणण्याची गरज

राजकीय संवाद घडून आणण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी व्यक्तिमत्त्व अस लागत की ज्या व्यक्तिमत्वाच्या बोलवण्याने सगळे येतील. अस महाराष्ट्रात एक व्यक्तिमत्व पवार साहेब आहेत. दुसरं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणीतरी बोलावलं तर कोण येणार नाही. सर्व राजकीय नेते ज्यांच ऐकतील अशी महाराष्ट्रातील नॉन पॉलिटिकल व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलीत. सगळ्या सिस्टीम या सरकारने मोडून काढल्यात. भडवा हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात आलाय? लोकांच्या हितासाठी कायदे करायचे असतात तेव्हा, तेवढी बिल काढून दे ना अशी भाषा वापरता बिल काढुन दे ही भाषा झाली?

उद्धवजींशी जवळीक निर्माण करण्यासाठी परंपरा मोडायची?

सगळ्या परंपरा पायदळी तुडवल्या गेल्यात, त्यातलीच एक परंपरा नीलम ताईंनी मोडतायेत. उद्धवजींशी जवळीक निर्माण करण्यासाठी परंपरा मोडायची? ऑन शरद पवार राजकीय संवाद दुर्दैवाने गेल्या 27 महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणातला संवादच तुटलाय. त्यामुळं विश्वासच राहिला नाही मी समजा शरद पवारांना पत्र लिहिलं तर त्याची चेष्टा केली जाईल असं वाटतं. तुम्ही म्हणता तर लिहतो पत्र, पवार साहेब पुढाकार घ्या. सगळ्यांना एकत्र बसवा, समजून सांगा, काय बोलायचं ते बऱ्या शब्दात बोला. काय राऊत शब्द वावरतात, आम्हला वापरता येत नाही असं नाही. मी गिरणगाव मध्ये वाढलोय, राऊतांना एखादं दिवशी अशी शिवी देईल की ती त्यांनी कधी ऐकलीच नसेल. पण मी देणार नाही मी संघाच्या संस्कारात वाढलोय, माझी एक संस्कृती आहे, ती तुमची पण असली पाहिजे. भडवा शब्द केव्हा पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आला हे गोधड्या ओल्या भिजवत होते त्यावेळेला आम्ही औरंगाबादच संभाजीनगर केलं गोधड्या भिजवत होते ही भाषा.

सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार; राणेंच्या अडचणी वाढणार?

ketu gochar 2022 | सावधान ! या 6 राशीच्या लोकांच्या आयुष्यात केतू निर्माण करेल अशांतता

घरकुलाचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, प्राजक्त तनपुरे यांनी दिले आश्वासन, नागपुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...