AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ketu gochar 2022 | सावधान ! या 6 राशीच्या लोकांच्या आयुष्यात केतू निर्माण करेल अशांतता

राशीचक्रात (Rashi) केतू हा अशुभ ग्रह मानला जाते. हा ग्रह सामान्यतः त्रासदायक मानला जातो. केतूचा अशुभ प्रभाव कोणत्याही व्यक्तीचे जीवन मोठ्या संकटात टाकू शकतो.

ketu gochar 2022 | सावधान ! या 6 राशीच्या लोकांच्या आयुष्यात केतू निर्माण करेल अशांतता
rahu
| Updated on: Feb 19, 2022 | 2:47 PM
Share

मुंबई :  राशीचक्रात (Rashi) केतू हा अशुभ ग्रह मानला जाते. हा ग्रह सामान्यतः त्रासदायक मानला जातो. केतूचा अशुभ प्रभाव कोणत्याही व्यक्तीचे जीवन मोठ्या संकटात टाकू शकतो. अशातच केतू (Ketu) 12 एप्रिल 2022 रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रह आणि नक्षत्रांचे (Nakshatra) खूप महत्त्वाचे स्थान आहे. ग्रहांच्या अशुभ दशामुळे जीवनावर शुभ-अशुभ प्रभाव दिसून येतो. ‘आज तक’ ने दिलेल्या माहितीनुसार राहू आणि केतू या दोन छाया ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या अनुकूल नसल्यामुळे त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. केतू 12 एप्रिल 2022 रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी राहू देखील राशी बदलून मेष राशीत प्रवेश करेल.ज्योतिषशास्त्रानुसार केतूच्या राशीतील बदलामुळे 7 राशीच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

केतूच्या संक्रमणाची तारीख आणि वेळ

राहुप्रमाणेच केतूलाही दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1.5 वर्षे लागतात. या वर्षी केतू मंगळाच्या अधिपत्याखाली असलेल्या वृश्चिक राशीतून शुक्राच्या अधिपत्याखाली असलेल्या तूळ राशीत 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11:18 वाजता प्रवेश करेल.

या राशींनी सावधान राहण्याची गरज

1- मेष: केतूच्या राशीतील बदलामुळे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात. त्वचेशी संबंधित अशाच काही काही समस्येचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. जर तुम्ही भागीदारी व्यवसायात असाल, तर या काळात तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात मोठे मतभेद किंवा संघर्ष होऊ शकतात.

2-वृषभ: हा काळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या असण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला इजा होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

3- सिंह: या राशीच्या लोकांना केतूच्या बदलामुळे कौटुंबिक सुख-शांतीमध्ये काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही गोष्टींवरून.वारंवार भांडणे होऊ शकतात. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल नाही.

4 तूळ: या काळात तुम्ही स्वत:ला थोडे हरवल्यासारखे वाटू शकता आणि या विषयावर चिंतनशील देखील होऊ शकता. तुमच्या व्यवसायासाठी नवीन धोरणे आणि कल्पना सादर करू शकतात.

5 वृश्चिक: अतिरिक्त प्रयत्नांसह, तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येयांसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल मानला जात नाही.

6 मीन : राशीच्या  लोकांना व्यावसायिक आघाडीवर सहज यश मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. या काळात तुम्हाला काही त्वचा रोग आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा

Chanakya Niti | काहीही झालं तरी, आयुष्यात या 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका नाहीतर…

‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निम्मीत्त राज्यभरातून शिवभक्त शिवनेरीवर

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.