Pune crime : खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण, पाच आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन! पुण्यातली धक्कादायक घटना

ज्ञानेश्वर चव्हाण हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने हिंजवडी पोलिसांत अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. मुलाचे वडील शंकर कश्यप हे पाणीपुरी विक्रेते आहेत.

Pune crime : खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण, पाच आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन! पुण्यातली धक्कादायक घटना
अपहरण प्रकरणी तीन आरोपींना मुद्देमालासह हिंजवडी पोलिसांनी केली अटकImage Credit source: HT
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 8:37 PM

पुणे : खंडणीसाठी (Ransom) पुण्यात एका पाणी पुरी विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 15 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या आरोपींनी 20 लाख रुपयांसाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण (Kidnapped) केले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपींमध्ये दोघे आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून तलवार, कोयता आणि पाच मोबाइल जप्त (Mobile seized) करण्यात आले आहेत. लक्ष्मण नथुजी डोंगरे (वय 22), ज्ञानेश्वर सचिन चव्हाण (वय 22), लखन किसन चव्हाण (वय 26) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंजवडीमध्ये हा प्रकार घडला.

हिंजवडी पोलिसांत तक्रार

ज्ञानेश्वर चव्हाण हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने हिंजवडी पोलिसांत अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. मुलाचे वडील शंकर कश्यप हे पाणीपुरी विक्रेते आहेत. तर मुलगादेखील त्यांना मदत करतो. दरम्यान, शनिवारी तो घरी येत असताना आरोपींनी त्याला शस्त्राचा धाक दाखवत त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. शंकर कश्यप यांनी पत्नीसह हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दोन पथक तयार केली आणि आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी 18 सीसीटीव्ही तपासले. यावेळी आरोपींनी या मुलाला एका कारमधून नेल्याचे दिसले. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला. शिक्रापूर परिसरात मलठण येथे तीच मारुती कार उभी असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तातडीने कार असलेल्या ठिकाणी जात वेषांतर करून आरोपींना अटक केली. दरम्यान, कारमधून अपहृत मुलाला बाहेर काढले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडील एक तलवार, कोयता आणि पाच मोबाइल जप्त केले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.