AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Elections | पिंपरी-चिंचवडमध्ये कच्च्या प्रभागरचनेला सुरूवात, वॉर्डांमध्ये बदल होणार?

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग आराखडा सुरू करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली आहे. कच्च्या स्वरूपात हा आराखडा तयार केला जात आहे.

PCMC Elections | पिंपरी-चिंचवडमध्ये कच्च्या प्रभागरचनेला सुरूवात, वॉर्डांमध्ये बदल होणार?
पिंपरी चिंचवड महापालिका
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 9:29 PM
Share

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग आराखडा सुरू करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली आहे. कच्च्या स्वरूपात हा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने ‘महानगरपालिका अधिनियम 2019’ अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये बहुपद्धतीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यानुसार आता प्रभाग रचनेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (The process of launching the draft ward plan for Pimpri Chinchwad Municipal Corporation election has started from today)

एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2022 मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. त्यासाठी आराखड्यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने सर्व महानगपालिकांना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये काम सुरू करण्यात आलं आहे. महापालिकांची व्यापकता लक्षात घेऊन वेळेवर प्रभागरचना पूर्ण व्हावी यासाठी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

महापालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या किंवा वगळण्यात आलेल्या क्षेत्रांचा विचार करून प्रभाग आखण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रभाग रचना, त्यावरच्या हरकती-सूचना, आरक्षण सोडत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

2011 च्या जणगणनेनुसार ठरणार प्रभाग

निवडणूक आयोगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये एक प्रभाग एक सदस्य पद्धतीनुसार निवडणूक होईल असं स्पष्ट केलं आहे. 2021 ची जनगणना झाली नसल्याने 2011 च्या जनगणनेनुसारच ही प्रभाग रचना केली जाणार आहे. एका प्रभागात सरासरी 21 हजार 423 मतदार असणार आहेत. आयोगाच्या निकषानुसार किमान मतदारांची संख्या ही सरासरीच्या 10 टक्के कमी आणि कमाल मतदारांची संख्या सरासरीच्या 10 टक्के जास्त असू शकतात. त्यानुसार एका प्रभागात कमीत कमी 19 हजार 221 मतदार तर जास्तीत जास्त 23 हजार 565 मतदार असू शकतात.

अशी ठरणार प्रभागरचना

प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

पुणे, पिंपरी चिंचवडसाठी आता ‘एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत’, महापालिकेत राजकीय समीकरणं बदलणार?

पुणे महापालिका निवडणूक | कशी ठरणार एक सदस्यीय प्रभाग रचना? कधी होणार निवडणूक? वाचा सविस्तर

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी, पुणे जिल्हा ऑक्सिजनसज्ज होण्याच्या मार्गावर!

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anana Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक