तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी, पुणे जिल्हा ऑक्सिजनसज्ज होण्याच्या मार्गावर!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी (Corona Third Wave) पुणे प्रशासनाकडून (Pune) तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत इतर औषधं आणि लसींसोबतच ऑक्सिजनची मागणी वाढणार आहे हे स्पष्ट आहे. त्यानुसार ऑक्सिजन निर्मितीसाठी नियोजन केलं जात आहे.

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी, पुणे जिल्हा ऑक्सिजनसज्ज होण्याच्या मार्गावर!
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:19 PM

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) औषधांसोबतच ऑक्सजनने (Oxygen) महत्वाची भूमिका बजावली. या काळात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी (Corona Third Wave) पुणे प्रशासनाकडून (Pune) तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत इतर औषधं आणि लसींसोबतच ऑक्सिजनची मागणी वाढणार आहे हे स्पष्ट आहे. त्यानुसार ऑक्सिजन निर्मितीसाठी नियोजन केलं जात आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडसह पुण्याच्या ग्रामीण भागात साधारण एक हजार 80  मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. (Pune administration planning for the availability of oxygen for a possible third wave of corona)

एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सुमारे सव्वा लाख सक्रिय कोरोनाबाधित होते. तिसऱ्या लाटेत या संख्येच्या दीडपट म्हणजे साधारणपणे एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन, खाटा, सिलेंडर यांची उपलब्धता करून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ऑक्सिजन उत्पादन आणि साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसात ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी ही 360 मेट्रीक टन होती. त्यावेळी तब्बल एक लाख रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर उपचार घेत होते. ऑक्सिजनची ही मागणी लक्षात घेऊन प्रशासन ऑक्सिजनची उत्पादन आणि साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आवश्यकतेनुसार पुढचे तीन दिवस मागणी एवढा ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहील यादृष्टीने नियोजन केलं जात आहे. त्यासाठी उद्योगांचीही मदत घेतली जाणार आहे.

पुणे जिल्हा ऑक्सिजनसज्ज होण्याच्या मार्गावर

यामध्ये 70 टक्के लिक्विड ऑक्सिजन, 20 टक्के ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प आणि 10 टक्के सिलिंडर स्वरूपातला ऑक्सिजन असणार आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 19 सरकारी तर 20 खासगी रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प कार्यरत आहेत. दोन ठिकाणी प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे. 16 ठिकाणी ऑक्सिजन जनरेश प्रकल्प कार्यरत असून आणखी 35 ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी पुणे जिल्हा ऑक्सिजनसज्ज होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यातच पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने नियोजन केलं होतं. त्यासाठी जिल्ह्यासह परराज्यांतूनही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. त्या अनुभवातून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातच पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

इतर बातम्या :

Mumbai Vaccination | मुंबईत आजपासून लसीकरण सुरु, राजावाडी रुग्णालयासमोर नागरिकांची मोठी रांग

Calcium Rich Food : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त ‘या’ पदार्थ समावेश करा !

आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? नागपूरमधील 700 हून अधिक पालकांचा सरकारला सवाल

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.