AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | प्रतिस्पर्ध्याचा अर्ज मागे, पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार पहिल्यांदाच बिनविरोध

सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध निवडून आले. अजित पवार यांचा अ वर्ग मतदारसंघातून अर्ज आहे.

Ajit Pawar | प्रतिस्पर्ध्याचा अर्ज मागे, पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार पहिल्यांदाच बिनविरोध
उपमुख्यमंत्री अजित पवार
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 09, 2021 | 8:04 AM
Share

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची (Pune District Bank Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी मागे घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. पहिल्यांदाच अजित पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली.

संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर चौघा जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. बुधवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरु झाली, त्यावेळी सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध निवडून आले. अजित पवार यांचा अ वर्ग मतदारसंघातून अर्ज आहे.

थोपटे-जगताप बिनविरोध

अजित पवार यांच्यासह सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले आहेत. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती.

भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीसमोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

– उमेदवारी अर्ज मागे घेणे : 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर

– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022

– मतमोजणी : 4 जानेवारी 2022

बँकेचे संचालक मंडळ : 21

– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13

– ब मतदार संघ : 1

– क मतदार संघ : 1

– ड मतदार संघ : 1

– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1

– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1

– विभक्त जाती व प्रजाती : 1

– महिला प्रतिनिधी : 2

संबंधित बातम्या :

PDCC Bank Election | काँग्रेसचे दोन आमदार बिनविरोध, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादा-भरणेंची प्रतिष्ठा पणाला

Ajit Pawar | पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!