Ajit Pawar | पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान

पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी (Pune District Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती (Baramati) तालुक्यातून अ वर्गातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या वतीने सुचक, अनुमोदकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Ajit Pawar | पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान
ajit pawar

बारामती : पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी (Pune District Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती (Baramati) तालुक्यातून अ वर्गातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या वतीने सुचक, अनुमोदकांनी अर्ज दाखल केले आहेत.

31 जणांनी उमेदवारी अर्ज भरले

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 31 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीसाठी 6 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे.

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सातवेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भुषवला आहे. आता यंदा हे चित्र पालटणार की यावेळीही ही निवडणूक अजित पवारच जिंकणार हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.

काळजी करण्याची गरज नाही, भाजपच निवडणूक जिंकणार – देवेंद्र फडणवीस

डॉ. सच्चीदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती निमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी नगरसेवकांसोबत बैठक घेतली त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्या मेळावा देखील घेतला. यावेळी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की काळजी करण्याची गरज नाही. येणाऱ्या निवडणुकीत मी स्वतः येणार आहे. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि आपण जिंकणारच. काही दिवसांपूर्वी भाजपचे 3 नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणखी काही नागरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसोबत गुप्तबैठक ही महत्वाची मानली जात आहे.

संबंधित बातम्या :

Published On - 9:06 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI