Video : एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!

आज महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला. त्यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी कोटी करत अजूनही डोक्यातून भाजप जात नसल्याचं म्हटलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Video : एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!
एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील

जळगाव : भाजप नेत्यांवर जोरदार हल्ले चढवत आणि गंभीर आरोप करत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा. पण आजही खडसेंच्या मनातून भाजप जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला. त्यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी कोटी करत अजूनही डोक्यातून भाजप जात नसल्याचं म्हटलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फॉर्म्युला काय?

दरम्यान, जळगावमधील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सर्वात आधी संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. त्यानुसार तीन वर्षांसाठी बँकेचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे असणार आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपद पहिली दोन वर्षे काँग्रेसकडे, पुढची दोन वर्षे शिवसेना तर शेवटचा एक वर्ष शिवसेनेकडे असणार आहे. जळगावमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कुणाच्या गळ्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची माळ पडणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तर कॉंग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उपस्थित होते. सुमारे दीड तास कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे.

इतर बातम्या : 

महाविकास आघाडीच्या संसारात ममता बॅनर्जींकडून मिठाचा खडा; काँग्रेस नेते आक्रमक, तर शिवसेना, राष्ट्रवादीची सारवासारव!

Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?

Published On - 11:17 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI