पुणे जिल्ह्यात पुन्हा शर्यतीचा धुरळा उडणार, शर्यतीला परवानगी, कुठे होणार शर्यत? वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील लांडेवाडीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, या शर्यतीला प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात पुन्हा शर्यतीचा धुरळा उडणार, शर्यतीला परवानगी, कुठे होणार शर्यत? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 9:20 PM

पुणे : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यातीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील लांडेवाडीत बऱ्याच वर्षांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे, या शर्यतीला प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असल्याचे निश्चित झाले आहे.

1 जानेवारीला बैलगाडा शर्यत

यंदा नववर्षाची सुरूवातच जंगी होणार आहे, कारण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ही शर्यत होणार आहे. आंबेगावमधील लांडेवाडीत दरवर्षी शितळादेवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण गावातील दत्तजयंती उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली आहे. 7 ते 8 वर्षानंतर गावातील बैलगाडा शर्यत पार पडणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बैलगाडा शर्यत ही एक परंपरा मानली जाते, त्याचबरोबर बैलगाडा शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून वारंवार बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

बैलगाडा शर्यतीत हे नियम पाळावे लागणार

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक असणार आहे. बैलगाडा शर्यतीत बैलांना इलेक्ट्रीक शॉक देणे, त्यांना बेदम मारहाण करणे असे प्रकार सर्सास होत असल्यानेच कोर्टाने शर्यतीवर बंदी घातली होती, असा कुठलाही प्रकार पुन्हा घडू नये असे आदेश न्यायलयाकडून देण्यात आले आहेत, मोठ्या प्रयत्नानंतर सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली आहे, त्यामुळे हेही नियम शर्यतीत पाळावे लागणार आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे, कारण राज्यात सध्या ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लावले जात आहेत. अशातच या शर्यती पार पडत असल्याने कोरोना नियमांचे भान राखावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नाशिकमधील बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यतीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर 9 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेलागममध्ये ही शर्यत पार पडली होती, या शर्यतीत कोरोना नियमही पायदळी तुडवण्यात आले होते, शर्यतीला आलेल्या लोकांना यावेळी मास्कचाही विसर पडल्याचे दिसून आले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.