By Elections : राज ठाकरे यांचं पत्राद्वारे बिनविरोधाचं आवाहन, पडद्यामागे नक्की घडतंय काय?

उमेदवार मृत लोकप्रतिनिधीच्या घरातला असेल तर बिनविरोध करा, असं आवाहन राज ठाकरेनी केलंय. मात्र कसब्यात भाजपनं टिळक कुटुबियांऐवजी बाहेरचा उमेदवार दिलाय. त्यावर नाना पटोलेंनी बोट ठेवलंय.

By Elections : राज ठाकरे यांचं पत्राद्वारे बिनविरोधाचं आवाहन, पडद्यामागे नक्की घडतंय काय?
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 11:26 PM

पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पत्र लिहून कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मविआ नेत्यांना फोनद्वारे बिनविरोधाचं आवाहन केलंय. यामागची गणितं नेमकी काय आहेत. चिंचवड आणि कसब्यातली स्थिती नेमकी काय आहे, पाहूयात हा रिपोर्ट.

कसबा आणि चिंचवडमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पत्राद्वारे बिनविरोधाचं आवाहन केलंय. पडद्यामागे नेमकं घडतंय काय. ते पाहण्याआधी सध्या कोण कोणत्या भूमिकेत आहे. ते पाहूयात.

राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणेच निवडणूक तोंडावर आल्यानंतर बिनविरोधाचं पत्र लिहिलंय. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यास आग्रही आहे. इथं भाजपनं दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी दिलीय.

हे सुद्धा वाचा

कसब्यातही भाजपनं उमेदवार जाहीर केलाय. भाजपच्या उमेदवारीनंतर काँग्रेसनंही तयारी सुरु केलीय. दुसरीकडे शिंदेंनी मविआ नेत्यांना फोनद्वारे बिनविरोधाचं आवाहन केलंय.

प्रकाश आंबेडकर म्हटलेत की उमेदवार शिवसेनेचा असल्यास आमचा पाठिंबा असेल, चिंचवड गणित काय आहे, ते समजून घेऊयात. चिंचवडमध्ये 2019 ला भाजपचे लक्ष्मण जगताप विरुद्ध अपक्ष राहुल कलाटेंमध्ये लढत झाली होती. जगताप 34 हजार मतांनी जिंकले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं अपक्ष कलाटेंनीही जगतापांविरोधात लाखांहून जास्त मतं घेतली.

यावेळी राहुल कलाटेंना राष्ट्रवादीचं तिकीट मिळू शकतं. मात्र कलाटे हे मूळ शिवसेनेचे असल्यामुळे ती जागा सोडण्याचा विनंती ठाकरे गटानं केलीय.

इकडे मतदानावेळी भाजपच्या अश्विनी जगतापांना सहानुभूती मिळू शकते. पण जर राहुल कलाटेंना राष्ट्रवादीसोबत काँग्रेस-शिवसेनेचं समर्थन मिळालं तर लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवारांचे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड भागात जम बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जर कलाटे जिंकले तर आगामी महापालिका सोपी जाईल, असा राष्ट्रवादीचा कयास आहे.

आता कसब्याचं गणित समजून घेऊयात

2019 कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक विरुद्ध काँग्रेसचे अरविंद शिंदेमध्ये सामना होता. मुक्ता टिळक 75 हजार मतं घेऊन 28 हजारांन जिंकल्या. तर शिंदेंना 47 हजार मतं मिळाली. भाजपनं मुक्ता टिळकांच्या निधनानंतर हेमंत रासनेंना तिकीट दिलं.

मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक त्यामुळे नाराजही झाले. पण सर्व्हेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचं सूचक विधान महाजनांनी केलं. कसब्यात यावेळी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारीची दाट शक्यता आहे. रासने आणि धंगेकर दोघंही मूळ कसब्यातले आणि जनसंपर्क असलेले नेते आहेत.

मात्र इथं भाजपनं घाटे आणि बीडकरांसहीत ३ इच्छुकांचे तिकीटं नाकारलीयत. त्यामुळे लढत चुरशीची होण्याची चिन्हं आहेत. राज ठाकरेंच्या पत्रावर टीकाही होऊ लागलीय. गेल्यावेळेस भाजपनं अंधेरीत उमेदवार जाहीर करुन त्याचा प्रचारही सुरु केला. मात्र नंतर राज ठाकरेंनी पत्र लिहिलं आणि त्यानंतर राजकीय संस्कृतीचं कारण देत भाजपनं माघार घेतली.

मृत लोकप्रतिनिधीचा घरचा उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. मात्र याआधी भाजपनं ज्या ३ पोटनिवडणुका लढवल्या., तेव्हा राज ठाकरेंनी पत्रं का लिहिलं नाहीत, असा प्रश्न विचारला जातोय.

पंढरपुरात राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर भाजपनं भालकेंचा पुत्र भगीरथ भालकेंविरोधात समाधान आवताडेंना उतरवून निवडणूक लढवली.

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधवांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधवांविरोधात भाजपनं सत्यजीत कदमांना तिकीट दिलं. देगलूरमध्ये काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनानंतर काँग्रेसनं त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकरांना तिकीट दिलं., तिथं भाजपनं सुभाष साबनेंना उमेदवारी दिली.

जर उमेदवार मृत लोकप्रतिनिधीच्या घरातला असेल तर बिनविरोध करा, असं आवाहन राज ठाकरेनी केलंय. मात्र कसब्यात भाजपनं टिळक कुटुबियांऐवजी बाहेरचा उमेदवार दिलाय. त्यावर नाना पटोलेंनी बोट ठेवत निवडणुकीची तयारी सुरु केल्याचं म्हटलंय.

कसबा आणि चिंचवडमधले अंडरकरंट नेमके काय आहेत. उमेदवारी जवळपास जाहीर झाल्यानंतर अचानक बिनविरोधावर जोर का दिला जातोय. असे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. निवडणुकांना काही महिने उरले असले. तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तोंडावर आहेत आणि त्यामुळे दोन्ही निवडणुका बिनविरोधाची शक्यता तूर्तास नाही मध्येच जमा आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.