चिंचवडमधील हॉटस्पॉट आनंदनगरात शेकडो नागरिक रस्त्यावर, जीवनावश्यक वस्तू संपल्याचा संताप

नागरिकांना कुठल्या प्रकारची मदत हवी आहे हे मात्र कुठलाही प्रशासन अधिकारी पहात नाही. असा आरोप करत जमावाने निषेध केला. (Pimpri Chinchwad Hotspot Anand Nagar Residents Gather on Road)

चिंचवडमधील हॉटस्पॉट आनंदनगरात शेकडो नागरिक रस्त्यावर, जीवनावश्यक वस्तू संपल्याचा संताप
Follow us
| Updated on: May 20, 2020 | 5:10 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध हॉटस्पॉट असलेल्या आनंदनगर परिसरामधील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. जीवनावश्यक वस्तू संपल्याने संयम सुटलेले रहिवाशी घराबाहेर जमले. (Pimpri Chinchwad Hotspot Anand Nagar Residents Gather on Road)

शहरातील चिंचवड येथील आनंदनगर परिसर हा भाग कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या परिसरातून तब्बल 30 हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आनंदनगर परिसरात 2300 घरे असून यामधील नागरिकांची लोकसंख्याही दहा हजाराच्या वर आहे.

कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढू नये यासाठी हा परिसर महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लागणारी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्याने हे लोक घराबाहेर पडले.

नागरिक रस्त्यावर आल्याने काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे नागरिक पुन्हा आपल्या घरी गेले, मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा आनंदनगर परिसर हॉटस्पॉट झाला असताना महापालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूची सुविधा स्थानिक नागरिकांना देण्यात आला नसल्याचा दावा केला जात आहे.

वातानुकूलित रुममध्ये बसून महापालिका प्रशासन अधिकारी हे परिसर सील करण्याचा निर्णय घेत असतात मात्र स्थानिक पातळीवर जाऊन या नागरिकांना कुठल्या प्रकारची मदत हवी आहे हे मात्र कुठलाही प्रशासन अधिकारी पहात नाही, असा आरोप करत जमावाने निषेध केला.

पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत शहरातील 233 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी दाखल शहराबाहेरील 40 रुग्ण बाधित आहेत. आज एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत शहरातील एकूण 133, तर शहराबाहेरील एकूण 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून शहराबाहेरील 9 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

(Pimpri Chinchwad Hotspot Anand Nagar Residents Gather on Road)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.