AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलर उभा राहिला नाही…नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचा इतिहास सांगत साधला निशाणा

pune metro narendra modi: पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. परंतु काम २०१६ मध्ये सुरु झाले. आमचे सरकार २०१४ मध्ये आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये मेट्रोची कामे सुरु झाली.

आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलर उभा राहिला नाही...नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचा इतिहास सांगत साधला निशाणा
नरेंद्र मोदी
| Updated on: Oct 01, 2024 | 7:09 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहरातील आणि राज्यातील विविध प्रकल्पांचे आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले. यावेळी पुणे मेट्रोचा इतिहास सांगत विरोधकांनी कसे कामे केली नाही, ते काँग्रेसचे नाव न घेता सांगितले. त्यांचा काळातील आठ वर्षांत मेट्रो प्रकल्पाचा एक पिलरसुद्धा उभा राहिला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पुणे मेट्रो पुण्यातील अनेक भागांत पोहचली आहे. अजून त्याचा विस्तार होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव

पुण्यात मेट्रो खूप आधी येण्यास पाहिजे होती. परंतु मागील काही दशकांत देशातील शहरांचा विकास झाला नाही. प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव राहिला. कोणतीही योजना पूर्ण होण्यासाठी अनेक दशके लागत होती. त्या जुन्या वर्क कल्चरमुळे मोठे नुकसान देशाचे आणि पुण्याचे झाले आहे. पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. परंतु काम २०१६ मध्ये सुरु झाले. आमचे सरकार २०१४ मध्ये आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये मेट्रोची कामे सुरु झाली. आता पुणे मेट्रोचे घौडदौड सुरु आहे. २०१६ पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जुना विचार आणि कार्यपद्धती असती तर एकाही कामे पूर्ण झाली नाही.

महिलांच्या बाबत दुजाभाव

मागील सरकारने आठ वर्षांत मेट्रोचा एक पिलर उभे करु शकले नाही. आमच्या सरकारे मेट्रोचा पुण्यात सर्वत्र विस्तार केला. विकास प्रमाणे महिलांच्या बाबतही मागील सरकारचा दुजाभाव होता, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, मागच्या सरकारने महिलांची एन्ट्री बंद केली होती. मुलींना शाळेचे दरवाजे बंद होते. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागायची. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. प्रेगन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदललं.

जुनी व्यवस्था बदलली. आम्ही स्वच्छ भारत योजना आणली. महिलांना त्याचा फायदा झाला. शाळेत शौचालये आणली गेली. त्यामुळे मुलींची शाळा सोडण्याचं प्रमाण कमी झालं. आम्ही आर्मी स्कूलच नव्हे तर सैन्यात अनेक पदावर महिलांना घेतलं. आम्ही अनेक कायदे आणले. नारी शक्ती कायदा आणला. महिलांच्या नेतृत्वाची गॅरंटी दिली आहे. आपल्या मुलींसाठी सर्व क्षेत्राचे दरवाजे उघडतील, तेव्हाच देशाच्या विकासाचे दरवाजे उघडतील. सावित्रीबाई फुले मेमोरियल महिला सशक्तीकरणाच्या अभियानाला अधिक प्रेरणा देईल. महाराष्ट्रतील धरती नेहमीप्रमाणेच देशाला मार्गदर्शन करेल. आपण विकसीत भारताचं लक्ष पूर्ण करू, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

हे ही वाचा…

पुणे मेट्रोचे टप्पे असे वाढत जाणार की पुणेकर कुठेही मेट्रोने फिरणार… देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला पुणे मेट्रोचा विस्ताराचा प्लॅन

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.