AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात ‘ऑपरेशन टँकर’, तीन तासांनी क्रेन दाखल, धक्कादायक घटनेचा सीसीटीवी फुटेज समोर

पुण्यात आज एक धक्कादायक घटना बघायला मिळाली. पुणे महापालिकेचा ड्रेनेज साफ करण्यासाठी गेलेला एक ट्रक रिव्हर्स घेत असताना, अचानक रस्त्याला भगदाड पडलं आणि त्या खड्ड्यात ट्रक कोसळला. या घटनेत चालक सुदैवाने बचावला.

पुण्यात 'ऑपरेशन टँकर', तीन तासांनी क्रेन दाखल, धक्कादायक घटनेचा सीसीटीवी फुटेज समोर
पुण्यात 'ऑपरेशन टँकर'
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 20, 2024 | 8:15 PM
Share

पुण्यात समाधान चौक परिसरात पुणे महापालिकेकडून ‘ऑपरेशन टँकर’ पार पडलं. हे ऑपरेशन पार पाडण्यामागील कारणही तसंच आहे. समाधान चौक जवळ सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात पुणे महापालिकेचा ट्रक ड्रेनेज साफ करण्यासाठी गेला होता. हा ट्रक आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गेला होता. यावेळी ट्रक मागे घेतला जात असताना अचानक रस्ता खचला आणि ट्रक तसाच त्या खड्ड्यात जावून कोसळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. घटना अतिशय भयानक होती. ट्रक रिव्हर्स होत असताना ट्रकची मागची चाकं उभ्या असलेल्या ठिकाणची जमिनी अचानक खाली गेली. तिथे खोल खड्डा पडला आणि पाहता-पाहता संपूर्ण ट्रक खाली कोसळला. यानंतर तिथे असलेल्या इतर नागरिकांनी ट्रकच्या दिशेला धाव घेतली. यावेळी चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.

संबंधित घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून ट्रकला बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु झाले. यासाठी अनेक क्लृपत्या लढवण्यात आल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकला दोरखंड बांधत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही.

यानंतर जेसीबीने ट्रक बाहेर काढला जाईल, अशी माहिती समोर आली. पण तसं काही झालं नाही. यानंतर क्रेन घटनास्थळी दाखल होईल, अशी माहिती समोर आली.

या घटनेनंतर काही वेळाने अनेक मोठमोठे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. अधिकाऱ्यांनी पाहणी करुन योग्य ते मार्गदर्शन केलं. पण घटनेनंतर तब्बल तीन तासांनी घटनास्थळी क्रेन पोहोचली. घटना घडून अडीच तास झाले तरी क्रेन न पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली होती.

या दरम्यान प्रशासनाकडून पडलेल्या ट्रॅकच्या बाजूला बॅरेकटिंग लावण्यात आले होते. यानंतर दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या साहाय्याने ट्रकला यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलं. ट्रक बाहेर निघाल्यानंतर प्रशासकीय कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

दरम्यान, संबंधित घटना कशी घडली? याचा तपास होतो का, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेची संपूर्ण पुणे शहरात चर्चा सुरु आहे. ट्रकचं वजन इतकं होतं की रस्ता खचला की त्यामागे आणखी वेगळं काही कारण होतं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिथे भगदाड पडलं तिथे याआधी विहिर होती का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

तसेच अशाप्रकारे घटना घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाकडून काय काळजी घेतली जाईल, याकडे आता पुणेकरांचं लक्ष असणार आहे.

पाहा घटनेचा सीसीटीव्ही फुटेज :

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?