AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात हवा प्रदूषण निर्माण करणाऱ्या पीएमपी होणार हद्दपार ; पीएमपी प्रशासनाचा मोठा निर्णय

पीएमपीने आता प्रदूषण निर्माण करणाऱ्या गाड्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण कमी कारणासाठी तसेच इलेक्ट्रिक वाहनाचा ताफा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात हवा प्रदूषण निर्माण करणाऱ्या पीएमपी होणार हद्दपार ; पीएमपी प्रशासनाचा मोठा निर्णय
pmp bus
| Updated on: Mar 20, 2022 | 8:30 AM
Share

पुणे – शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी बसेसचा (PMP Bus ) सार्वधिक वापर केला जातो. पीएमपीच्या ताफ्यातील अनेक पीएमपी बसेस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. साहजिक या गाड्या धुरामुळे शहारातील प्रदूषण (pollution) वाढण्यास मोठी मदत होत आहे.मात्र पीएमपीने आता प्रदूषण निर्माण करणाऱ्या गाड्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण कमी कारणासाठी तसेच इलेक्ट्रिक वाहनाचा (electric vehicle)ताफा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.ताफ्यात फक्त 233 मिडी बसच डिझेलवरील उरल्या असून, त्यादेखील इलेक्ट्रिक करण्याचा पीएमपीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे यापुढे धूर सोडत धावणारी पीएमपी नागरिकांच्या नजरेस पडणार नाही.

सीएनजीवरील बसचा समावेश

पीएमपीच्या ताफ्यात एनजीवरील बसचा समावेश झाला. त्यानंतर आता इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल होत आहेत. पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पदभार स्वीकारताच सर्व डिझेलवरील बस ताफ्यातून काढून पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ताफ्यातील सर्व डिझेल बस काढण्यात आल्या आहेत. डिझेलवर धावणार्‍या आता फक्त मिडी बसच पीएमपीच्या ताफ्यात आहेत.

ई-बसमध्ये रूपांतर करण्याचा उपक्रम

पीएमपी प्रशासनाने डिझेलवरील मिडी बस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा पीएमपीने नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे नियोजन पीएमपीचे मुख्य समन्वयक सुनील बुरसे करीत आहेत. त्यानुसार एका डिझेल बसचे सध्या पीएमपीने इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर केले आहे. पाहणीसाठी आणि अंतिम अहवालासाठी अ‍ॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडे (एआरएआय) ही बस देण्यात आली आहे. मान्यता मिळाल्यास विनाखर्च आणि विनामनुष्यबळ पीएमपी ताफ्यातील 233 मिडी बससुद्धा इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.

Asia Cup 2022: T20 वर्ल्डकपपूर्वीच भारत-पाकिस्तान आमनेसामने, आशिया चषक स्पर्धेच्या तारखा जाहीर

US Army Helicopter crash : अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश, 4 सैनिक दगावले, कशी घडली दुर्घटना?

Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ, उस्मानाबादेत काय घडतंय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.