AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट निवडणूक लढवणार का? असीम सरोदे यांची पोस्ट चर्चेत

Vidyanand Bapat : डीजे बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना आता चांगली प्रसिद्धी, ओळख मिळाली आहे. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचं कारण आहे असीम सरोदे यांची पोस्ट.

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट निवडणूक लढवणार का? असीम सरोदे यांची पोस्ट चर्चेत
vidyanand bapat
| Updated on: Sep 23, 2026 | 8:38 AM
Share

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. महायुतीकडून या निवडणुकीची तयारी सुरु आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून निवडून येणाऱ्या उमेदवाराला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आता डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याच कारण आहे असीम सरोदे यांची एक्स पोस्ट. प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करुन विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे विद्यानंद बापट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. असीम सरोदे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलय? ते जाणून घेऊया.

“माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षस विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का?” असं असीम सरोदे यांनी विचारलं आहे.

हल्ला सुद्धा झाला

विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकतील डीजेच्य दणदणाटाविरोधात आवाज उठवला. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला सुद्धा झाला. पण त्यामुळे महाराष्ट्रात डीजे दणदणाटाविरुद्ध जागरुकता निर्माण झाली. विद्यानंद बापट यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्वदेखील चर्चेचा विषय बनलं आहे.

लाऊडस्पीकरबद्दल विद्यानंद बापट यांचे विचार काय?

“लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. खुल्या वातावरणील लाऊडस्पीकरवर बंदी आणली पाहिजे. खरंतर ही समस्या मूळापासून सोडवली पाहिजे. खुल्या वातावरणात लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी दिल्यानंतर नैतिक अधिकार फारसा राहत नाही. सणांच्या दिवसात अंमलबजावणीत शिथिलता येते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून कारवाई करणे गरेजेचे आहे.त्यांनी आधीच रोखण्याची योजना आखली पाहिजे” असं विद्यानंद बापट यांचं मत आहे.

Follow Us
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...