एकीला वाचवण्यासाठी चौघीही पाण्यात उतरल्या, काठावर उभ्या असलेल्या 9 वर्षांच्या मुलीदेखतच पाचही जणी बुडाल्या

Pune Bhatghar Dam Accident : गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य सुरू होतं. पाचही मृत तरुणी पुणे शहरातल्या आहेत.

एकीला वाचवण्यासाठी चौघीही पाण्यात उतरल्या, काठावर उभ्या असलेल्या 9 वर्षांच्या मुलीदेखतच पाचही जणी बुडाल्या
पुण्यातील भोरमधील भाटघर धरणात पाच तरुणी बुडाल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 6:48 AM

पुणे : पुण्याच्या भोरमधील (Bhor, Pune News) भाटघर धरणात पाच तरुणींचा मृत्यू (5 girls Killed) झाला. पाचही तरूणींचे मृतदेह शोधण्यात यश आलंय. धरणात बुडून मृ्त्यू झालेल्या पाचही तरूणींचे मृतदेह सह्याद्री रेस्क्यू टीम, भोईराज जलआपत्ती पथकं आणि ग्रामस्थ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलेत. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य सुरू होतं. पाचही मृत तरुणी पुणे शहरातल्या आहेत. भाटघर धरण (Bhatghar Dam) परिसरातील नऱ्हे गावात नातेवाईकांकडे त्या आल्या होत्या. पुणे ग्रामीणचे अतिरीक्त पोलीस अधीक्षण मिलिंद मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. संध्याकाळी फिरण्यासाठी म्हणून पाच तरुणी आणि 9 वर्षाची लहान मुलगी भाटघर धरणं क्षेत्रात गेल्या होत्या.

का बुडाल्या?

फिरण्यासाठी गेलेल्या या पाचही तरुणी पाण्यात उतरल्या असताना त्यातील एक जण पाण्यात बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी बाकीच्या तरुणी गेल्या असताना या पाचही जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या बरोबर असलेली लहान मुलगी काठावरचं उभी असल्यानं तिचा जीव वाचलाय. वाचलेल्या लहान मुलीने तिच्या जवळ असलेल्या मोबाईलवरून कॉल करून घरच्यांना कळविल्यानंतर ही घटना समोर आली. मृत्तांचे पोस्ट मॉर्टेम करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाहा व्हिडीओ : स्पेशल रिपोर्ट

हे सुद्धा वाचा

तिघींचा सुरु होता शोध

पाच पैकी तिघींचे मृतदेह गुरुवारीचं हाती लागले होते. तर दोघींचा शोध सुरु  होता. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी बचावकार्य केलं जात होतं. अखेर इतर दोन तरुणींचे मृतदेहदेखील हाती लागले आहेत. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पाच महिलांचा मृत एकदमच झाल्याने धरण परिसरात एकच खळबळ उडाली..

मृतांची नावं पुढीलप्रमाणे..

भोरमधील भाटघर धरणावर पर्यटनासाठी खुशबू लंकेश रजपूत (वय 19), मनीषा लखन रजपूत (वय 20), चांदणी शक्ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22), मोनिका रोहित चव्हाण (वय 23) या पाच तरुणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाला आहे. या पाच ही तरुणी हडपसरच्या असून त्या पर्यटनासाठी भोरमधील भाटघर धरणावर पर्यटनासाठी आल्या होत्या. या तरुणी मौज मजा करण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ही दुर्घटना घडली. पाचही तरुणी धरणात बुडाल्यानंतर त्यांचे साहित्य मात्र धरणाच्या काठावर तसेच पडून होते. त्यांचे चप्पल, मोबाईल, पर्स आदी साहित्य तिथेच आढळून आलं होतं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.