AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका, शेतात गारांचा खच

हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण अणि मराठवाड्यात पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain : काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका, शेतात गारांचा खच
Unseasonal Rain Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 17, 2023 | 8:18 AM
Share

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील पोंबर्डी गावच्या परिसराला, संध्याकाळच्या सुमारास गारांसह पडलेल्या जोरदार पावसानं झोडपून काढलं. तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं, आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. तर गारांमुळं सर्वत्र पांढरी चादर पसरल्याच चित्र पाहायला मिळालं. मागच्या काही दिवसात बिघडलेल्या वातावरणाचा, अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना फटका बसत असल्यानं बळीराजा चिंतेत आहे. आज सुध्दा राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली आहे.

भोरमध्ये सायंकाळच्या सुमारास तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं, भोर शहरातील गटार तुंबली, भोईआळी परिसरातील घरांमध्ये गटाराचं पाणी शिरलं. हे पाणी घरात शिरू नये यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. शहरातल्या गटारांची साफसफाई न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त करत, नगरपालिकेनी गटार स्वच्छ करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

भोर तालुक्यात रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पाऊस सुरु असताना नारळाच्या झाडावर वीज कोसळ्यानं झाडाने पेट घेतल्याची घटना घडली. भोर तालुक्यातील नांद गावात ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मागच्या तीन दिवसातली नारळाच्या झाडावरं वीज पडल्याची ही दुसरी घटना असल्यानं, अवकाळी पावसाने नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

या आठवड्यात राज्यात अनेक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उष्णता देखील वाढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलं असून राज्यातील अनेक भागात सकाळी कडक ऊन आणि दुपारी जोरदार पावसाचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात चालू आठवड्यात देखील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आली आहे.

या भागात तापमान वाढणार…

हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण अणि मराठवाड्यात पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र यासह कोकणात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. तर राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेत होणार मोठी वाढ होणार आहे. पुणे शहराचे तापमान देखील 39 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज, तर नागपूरच तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल असं पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.