AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहर काँग्रेसला खिंडार: कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंच्या कुटुंबातील ‘त्या’ सदस्याचा भाजपात प्रवेश

भारतीय जनता पक्षाचे विचार आणि माननीय नरेंद्र मोदीजींचे कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार. दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली

पुणे शहर काँग्रेसला खिंडार:  कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंच्या कुटुंबातील 'त्या' सदस्याचा भाजपात प्रवेश
pune pranay shinde join Bjp
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 2:37 PM
Share

पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या(Pune Municipal elections)तोंडावर शहरात राजकीय पक्षांच्या फोडफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मागेही काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. महानगरपालिकेची प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर सावंत यांनी भाजपासोडून (BJP) राष्ट्रवादीत   प्रवेश केला असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला(congress)   खिंडार पाडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि समाजसेवक तुकाराम शिंदे यांचे नातू प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदर चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत केले असून , त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींचे काम जनतेपर्यंत पोहचवन्याचे काम करावे

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींजीच्या कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह माननीय मोदीजींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे. एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही. उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.

मोदींच्या कामामुळे प्रभावित होऊन पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाचे विचार आणि माननीय नरेंद्र मोदीजींचे कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार. दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली. यावेळी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची तारीख ठरली, छगन भुजबळ यांच्याकडून महत्त्वाची माहिती

Nitesh Rane: नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, तातडीने कोल्हापूरकडे रवाना

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची छोटी मुलं चालवतायत रेस्टॉरंट; Video पाहून Anand Mahindraही भावुक, म्हणाले…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.