सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची तारीख ठरली, छगन भुजबळ यांच्याकडून महत्त्वाची माहिती

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Statue) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवार 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता अनावरण करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची तारीख ठरली, छगन भुजबळ यांच्याकडून महत्त्वाची माहिती
सावित्रीबाई फुले पुणे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तारीख ठरली
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 2:13 PM

मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University Pune) साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Statue) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवार 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र, काही कारणांमुळं ते लांबणीवर पडलं होतं.विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यासाठी छगन भुजबळ आणि समता परिषदेच्या वतीनं प्रयत्न करण्यात आले आहेत.

14 फेब्रुवारीला पुतळ्याचं अनावरण

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून व मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार होते.मात्र कोरोनाचा प्रभाव अधिक वाढल्याने सदरचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.हा पुतळा व परिसरातील सुशोभिकरण पूर्णत्वास आले असून सोमवार 14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

छगन भुजबळ यांच्याकडून पाठपुरावा

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ओळख मुख्य इमारत आहे. या इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर महिन्यात छगन भुजबळ यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी केली होती.

पुतळा अनावरणाची विद्यार्थ्यांची मागणी

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात यावं, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा देखील संपली आहे.

इतर बातम्या:

Lata Mangeshkar: शाहरुख खानला ट्रोल करणं हा नालायक आणि बेशरमपणा आहे; संजय राऊत संतापले

Amravati School Reopen : अमरावतीमध्ये शाळा कॉलेज सुरु करण्यास परवानगी, सार्वजनिक सुट्टीमुळं उद्यापासून वर्ग भरणार

Chhagan Bhujbal said statue of Savitribai Phule University will inaugurate on 14 February

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.