.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरातील अटक केलेल्या अतिरेक्यांनी उभारली प्रयोगशाळा, ड्रोनने अनेक ठिकाणांचे काढले फोटो

Pune Crime News : पुणे शहरातून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दोन्ही दशतवाद्यांच्या निशाण्यावर पुणे अन् मुंबई शहर होते. दोन्ही शहरात घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता. त्यांनी प्रयोगशाळाही उभारली होती.

पुणे शहरातील अटक केलेल्या अतिरेक्यांनी उभारली प्रयोगशाळा, ड्रोनने अनेक ठिकाणांचे काढले फोटो
pune terrorist
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 04, 2023 | 4:24 PM
Share

पुणे | 4 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातून इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात ही अटक झाली होती. अटक केलेले दोघे दहशतवादी निघाल्यानंतर हा तपास एटीएसकडे देण्यात आला. एटीएसने या प्रकरणात अटक केलेले दहशवाद्यांना मदत करणाऱ्या इतर तिघांनाही अटक केली आहे. या अतिरेक्यांनी पुणे, मुंबईत बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. त्यांनी एक प्रयोगशाळाही उभारली होती. त्या प्रयोगशाळेतून अनेक आक्षेपार्ह ऐवज जप्त करण्यात आले.

प्रयोगशाळाच उभारली

दोन्ही दहशतवादी विविध प्रयोग करत होते. त्यांच्या त्या प्रयोगशाळेतून 500 GB डाटा मिळाला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील अनेक स्थळांचे फोटो आहेत. हे फोटो ड्रोनने घेतले गेले आहे. केमिकल पावडर, गुगल मॅपचे विविध ठिकाणांचे स्क्रीन शॉट मिळाले आहे. मुंबईतील छाबडा हाऊसचे फोटो त्यांना घेतले होते. या सर्व वस्तू त्यांनी एका गुप्त ठिकाणी ठेवल्या होत्या. आरोपींनी ज्या दुकानावरुन सामानाची खरेदी केली होती, ती दुकानही मिळाली आहे. दोन्ही दहशतवादी ऑडिओ, व्हिडिओ फोटो घेण्यासाठी ड्रोनचा वापर करत होते. त्यांनी पुणे शहरातील अनेक ठिकाणांचे फोटो घेतले आहेत. एटीएसने त्यांच्याकडून जप्त केलेला ऐवज प्रयोगशाळेत पाठवला आहे. त्यात केमिकल पावडराचा समावेश आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

दहशतवाद्यांच्या घरुन टेन्ट जप्त

दहशतवाद्यांच्या घरुन बांबूचा टेन्ट जप्त करण्यात आला आहे. हे दोघे कुठेही गेल्यानंतर हॉटेल ऐवजी टेन्ट उभारुन राहत होते. राज्यातील अनेक ठिकाणी ते टेन्टमध्येच राहिले आहे. यामुळे एनआयएच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत असतानाही दीड वर्षांपासून ते सापडत नव्हते.

यांना झाली आहे अटक

इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना अटक केल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्या इतर तिघांना अटक केली आहे. त्यात झुल्फीकार अली बडोदावाला, अब्दुल पठाण आणि सीमाब नसरुद्दीन काजी यांचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक झाली आहे. बडोदावाला याला इसिस प्रकरणात यापूर्वीच एनआयएने अटक केली होती. तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहात होता. त्याचा संबंध साकी आणि इम्रान खानशी आल्यानंतर एटीएसने प्रोडक्शन वारंट त्याला ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा

पुणे, मुंबईत टाईम बॉम्बचा वापर करुन घातपातचा होता कट, पुणे शहरात कुठे करणार होते स्फोट

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर