AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कंपनीने महिलेला पोर्तुगालमध्ये विकले, ती मायदेशी परताताच… पोलिसही हादरले

पुण्यातील एका कंपनीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कंपनीने एका महिलेला पोर्तुगालमध्ये विकले. जेव्हा तिला मालकाने सांगितले की, 'तुला खरेदी करण्यासाठी मी भारतातील एजंट्सना पैसे दिले आहेत' तेव्हा तिला धक्काच बसला.

पुण्यातील कंपनीने महिलेला पोर्तुगालमध्ये विकले, ती मायदेशी परताताच... पोलिसही हादरले
Women Sold In PortugalImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 8:12 AM
Share

युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले. तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर या महिलेने स्वतःची सुटका करून घेत पुन्हा पुणे गाठले आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या या खळबळजनक प्रकरणात पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली.

नेमकं काय घडलं?

देश विदेशातील अनेकांना विदेशात विकणाऱ्या या टोळीचे चार सदस्य पुण्यातील तर चार सदस्य पोर्तुगालमधील आहेत. पीडित महिला २८ वर्षांची आहे. ती नोकरीच्या शोधात असताना डिसेंबर २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर पुण्यातील विमान नगर परिसरातील ‘वी मायग्रेट’ नावाच्या कन्सल्टन्सीची तिला माहिती मिळाली. संपर्क केल्यावर एजन्सीने तिला पोर्तुगालमध्ये कॅशिअरच्या नोकरीचे आमिष दाखवले. दरमहा १.५ लाख रुपये पगार आणि दररोज फक्त ८ तासांचे काम, असे सांगण्यात आले. नोकरीसाठी विविध प्रक्रियेकरिता तिच्याकडून टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये उकळण्यात आले. धक्कादायकबाब म्हणजे, नंतर आरोपींनी तिची पोर्तुगालमधील एका बिअर शॉपच्या मालकाला विक्री केली.

महिलाला कळाले धक्कादायक वास्तव

तिथे महिलेकडून जबरदस्तीने नको ते काम करून घेण्यात आले. जेव्हा महिलेने याचा विरोध केला, तेव्हा मालकाने तिला ‘तुला खरेदी करण्यासाठी मी भारतातील एजंट्सना पैसे दिले आहेत’ असे सांगितले. या घटनेने हादरलेल्या महिलेने आपल्या पतीशी संपर्क साधून आपल्याला फसवले गेले, याची माहिती दिली. पतीने तिला दिलासा देऊन तेथून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. महिनाभर सदरील महिलेने जीवनयातना भोगल्यानंतर तिने आपली सुटका करून देश गाठला.

मायदेशी परतताच तक्रार दाखल

महिलेने तक्रार करून तरुण-तरुणीची मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला. पीडितेने पुणे गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर गुन्हे शाखेने पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात ८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. प्रतिभा भाटी, अनिलकुमार, अजहर शेख, वामसी, चैतन्य, हिम्मत सिंग आणि कपिल मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस सध्या या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा तपास करत असून, अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...