Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime News | कार चालकाकडून महिलेची कोट्यवधीत फसवणूक, दोन वर्षांनंतर उघड झाला प्रकार

Pune Crime News | पुणे शहरात फसवणुकीचा एका वेगळाच प्रकार घडला आहे. फसवणुकीचा हा प्रकार तब्बल दोन वर्षांनी उघड झाला आहे. महिलेच्या कारचालकाने तिची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Pune Crime News | कार चालकाकडून महिलेची कोट्यवधीत फसवणूक, दोन वर्षांनंतर उघड झाला प्रकार
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 12:50 PM

पुणे | 22 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील एक महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार तब्बल दोन वर्षांनी समोर आला. त्या महिलेची फसवणूक करणारा व्यक्ती तिच्या कारचालक म्हणून काम करणार व्यक्तीच निघाला. त्याने महिलेची कोट्यवधी रुपयांमध्ये फसवणूक केली. विशेष म्हणचे फसवणुकीचा हा प्रकार महिलेचा मृत्यूनंतर समोर आला. या प्रकरणी 30 वर्षीय कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. अजय राजाराम भडकवाड असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे फसवणुकीचा प्रकार

नाना पेठेत राहणारी एका वर्षीय महिलेचा डिसेंबर 2021 मध्ये मृत्यू झाला. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून कार्यरत होता. त्या महिलेचा 62 वर्षीय पुतण्या जर्मनीत राहत होते. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी ते भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कगदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी 1 कोटी 64 लाख रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

असा उघड झाला प्रकार

महिलेच्या नावावर अनेक शेअर होते. अजय भडकवाड याला हे माहिती होते. महिलेच्या मृत्यूनंतर त्याने खोट्या सह्या करुन शेअर विकले. त्याचा पैसा महिलेच्या खात्यात जमा झाला. मग तिच्या बँकेच्या कागदपत्रावर खोट्या सह्या करुन सर्व पैसे सहकारी बँकेत त्याच्या खात्यात वर्ग केले. हा सर्व प्रकार महिलेच्या पुतण्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांने तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची तपासणी केल्यानंतर 1 कोटी 64 लाख फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अजय भडकवाड याला अटक केली.

हे सुद्धा वाचा

यामुळे होते त्याला बँकींगचे ज्ञान

अजय भडकवाड महिलेकडे पार्ट टाईम ड्रायव्हर होता. तो एका फायनान्स कंपनीत अर्धवेळ काम करत होता. त्यामुळे त्याला शेअर्स आणि बँकिंगचे चांगले ज्ञान होते. त्याचा वापर करत त्याने फसवणूक केली, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे पोलिसी निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.